शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हे; रुपाभवानी नाला, तुळजापूर नाक्यावर कारवाई

By रवींद्र देशमुख | Updated: March 10, 2024 19:26 IST

Solapur News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. शहरातील रुपभवानी मंदिर नाल्याजवळ आणि तुळजापूर नाका हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलम ८ (क) अन्वये गुन्हे नोंदले आहेत.

- रवींद्र देशमुख  सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. शहरातील रुपभवानी मंदिर नाल्याजवळ आणि तुळजापूर नाका हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलम ८ (क) अन्वये गुन्हे नोंदले आहेत. अविनाश शिवाजी चव्हाण (वय- २०, मंत्री चंडक, हैद्राबाद रोड, सोलापूर) व अर्जुन महादेव भांडेकर (वय- २४, वडार गल्ली मड्डी वस्ती, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशानुसार जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी अवैध प्रकार घडणाऱ्या घटनांवर नजर ठेऊन पेट्रोलिंग द्वारे मोहीम आखण्याच्या सूचना केल्या होत्या. या दरम्यान फौजदार बामणे, पोलीस हरिकांत सरवदे यांना रुपाभवानी मंदिर नाल्याजवळ आडोशाला एक तरुण गांजा सेवन करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीत अंमली पदार्थ सेवन केल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला. याशिवाय आणखी एका तरुणाला सपोनि जाधव, पोलीस स्वप्नील कसगावडे यांच्या पथकाने अर्जुन भांडेकर याला तुळज़ापूर नाक्याजवळ पकडून त्याचीही तपासणी केली आणि वरील प्रमाणे गुन्हा नोंदवला.

अंमली पदार्थांचे सेवन नकोअंमली पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी बजावले आहेत. सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन जोडभावी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर