शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या पर्यटनाचे संशोधन व्हायला हवे : डॉ. मृणालिनी फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:02 IST

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथल्या पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटनस्थळांचे संशोधन व्हावे असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यानी केले.जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेज पर्यटन  विभगाच्या वतीने आयोजित सोलापूर भूईकोट किल्ले दर्शन उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संगमेश्वर एजुकेशन सोसायटीचे ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत - फडणवीसपर्यटनाला सोलापूरमधे वाव असून पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा - फडणवीस

सोलापूर: सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथल्या पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटनस्थळांचे संशोधन व्हावे असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यानी केले.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेज पर्यटन  विभगाच्या वतीने आयोजित सोलापूर भूईकोट किल्ले दर्शन उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संगमेश्वर एजुकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राजशेखर येळीकर, प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, पर्यटनविभाग समनवयक डॉ. राजकुमार मोहरकर उपस्थित होते.

 डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहेत. पर्यटनाला सोलापूरमधे वाव असून पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा. याप्रसंगी बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, सोलापूरचा इतिहास प्राचीन आहेमध्यवर्ती भागात भूईकोट किल्ला आणि सिध्दरामेश्वर मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. सध्या मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पर्यटनात वाढ होईल. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी मॉडर्न हायस्कूल, संभाजीराव शिंदे प्रशाला, सिद्धेश्वर प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.सुत्र संचालन प्रा. मेघा होमकर  प्रास्ताविक डॉ. राजशेखर येळीकर यांनी केले आभार  डॉ. मोहरकर यांनी मानले.

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरSchoolशाळा