शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: मंगळवेढ्याजवळ टेम्पोची दुचाकीचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:05 IST

Solapur Accident News: दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली. 

- मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा -  दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली. दरम्यान अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना  प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे राजरोस अवजड वाहतूक होत असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत नागरिकांनी मंगळवेढा -पंढरपूर मार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.

कमल पांडुरंग साळुंखे (वय ५३, रा.जय भवानीनगर, संत चोखामेळा नगर, मंगळवेढा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून पती पांडुरंग साळुंखे (वय.६१) हे या अपघातात जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पती पांडुरंग साळुंखे पत्नीला गोपनबाई बोराळे रोड येथील आज सकाळी पत्नीला सोडण्यास मोटरसायकल (एम एच १३ बीए ८१०९) वरून जात होते. याचवेळी दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अजित जगताप, राहुल सावजी, सुहास पवार , युवराज घुले, शंकर गांडूळे,प्रवीण खवतोडे, सोमनाथ बुरजे, पांडुरंग नकाते, हर्षद डोरले,विनायक कलुबरमे, प्रफुल्ल सोमदळे, मोहन हेबांडे, संभाजी घुले, दत्ता सारगर, अर्जुन ओमने यांच्या सह सप्तशृंगी नगर, चोखामेळा नगर,  दामाजी नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर