शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात सूर्य आग ओकू लागला; पारा ४२़९ अंशावर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:53 IST

आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद; कोरोनाबरोबर उकाड्याचे दुहेरी संकट

ठळक मुद्दे रविवारी तीन मे रोजीचे तापमान हे यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक मागील काही दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहेयेत्या काळामध्ये वादळी वारा व पाऊस येण्याची शक्यता

सोलापूर : एकीकडे लॉकडाऊनमुळे घरात राहण्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत घरात थांबणेही कठीण झाले आहे. रोजच सोलापूरच्यातापमानाचा पारा वाढतच चालला आहे. रविवारी यावर्षीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात दररोज वाढ होत आहे. सूर्य आग ओकत असल्याने रविवारी सोलापूर चांगलेच तापले. शहराचा पारा ४२.९ अंशांवर गेला. यावर्षीच्या आजअखेरच्या सर्वाधिक तापमानाची रविवारी नोंद झाली. वाढत्या उष्म्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे घरात असल्याने पंखा, एसी, कुलर यांचा वापर देखील वाढला आहे. २८ एप्रिल रोजी ४० अंश सेल्सिअसवर  असणाºया तापमानात रोज वाढ होताना दिसत आहे. रोज सरासरी ०.५ ते ०.८ अंश सेल्सिअसची वाढ होत आहे.

वाढत्या उष्म्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा काढणाºया उष्म्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात रोज वाढ होत आहे. रविवारी सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. सकाळपासूनच अंग घामाघूम होत होते. अनेक घरांत रात्रीपासून सुरू केलेले पंखे आज दिवसभर चालू होते.

लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसले तरी अनेकांनी झाडाखाली, बागेत थांबणे पसंत केले. गारवा मिळावा म्हणून नागरिक कुलर, पंखे व इतर साधनांचा वापर करत असतात; मात्र लॉकडाऊनमुळे कुलर व पंखे आणि इतर साहित्याची खरेदी करता येत नाही. अथवा काही बिघाड असल्यास कारागीरसुद्धा घरी येत नसल्याने अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

वाढत असलेले तापमान

  • - २८ एप्रिल - ४० अंश सेल्सिअस
  • - २९ एप्रिल - ४०.८ अंश सेल्सिअस
  • - ३० एप्रिल - ४१.३ अंश सेल्सिअस
  • - १ मे - ४२. १ अंश सेल्सिअस
  • - २ मे - ४२. ८ अंश सेल्सिअस
  • - ३ मे - ४२.९ अंश सेल्सिअस
  • - २१ मे २०१५ - ४३.८
  • - २१ एप्रिल २०१६ - ४४.९
  • - १८ एप्रिल २०१७ - ४३.८
  • - २ मे २०१८ -  ४३. ७
  • - २१ मे २०१९ - ४५.०

रविवारी तीन मे रोजीचे तापमान हे यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक आहे. मागील काही दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहे. येत्या काळामध्ये वादळी वारा व पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस आल्यास तापमानात घट होऊ शकते.-मिलिंद हरहरे, मौसम वैज्ञानिक, हवामान कार्यालय, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य