शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:24 IST

उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला

आॅनलाइन लोकमत सोलापूरमंद्रुप दि २० : उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला. भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यासमोर बळीराजा, स्वाभिमानी, प्रहार व जनहित शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाचा यल्गार पुकारला आहे. याला तिसºया दिवशी वाढता प्रतिसाद मिळत असून, लोकमंगल कारखाना अजूनही बंदच आहे. सोमवारी साखर कारखान्यांवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता़ उपविभागीय पोलीस अधिकाºयांसह अन्य पोलीस अधिकारी कारखानास्थळावर बंदोबस्तात होते़ तिसºया दिवशी प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर, सोसायटीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत बिराजदार, उमाशंकर पाटील, भीमाशंकर बिराजदार, महादेव नागटिळक, दत्ता मस्के, सुरेश मस्के, माऊली जवळेकर, माऊली हळणवर, किसन घोडके, अख्तरताज पाटील, वसंत पाटील, आमसिद्ध बिराजदार, डॉ. शिवानंद झळके, रामचंद्र देशमुख, इरप्पा जावळे, सायप्पा कांबळे यांनी शुक्रवारपासून धरणे धरले आहे. रविवार हा आंदोलनाचा तिसरा दिवस होता. ऊस वाहतुकीच्या गाड्या अडविण्यात येत असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, जकराया, जयहिंदसह अन्य साखर कारखान्याला जाणाºया उसाची वाहने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अडवित आहेत. बसवनगर चौकातही काही गाड्यांची हवा सोडण्यात आली तर मंद्रुप-निंबर्गी दरम्यान १५ ट्रॅक्टर मालकांनी स्वत:हून नुकसान टाळण्यासाठी लावले आहेत. आंदोलनाचा धसका घेत बैलगाडी ऊसतोड मजुरांनीही रविवारी तोड थांबवली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि अजित त्रिपुटे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. -----------------राष्ट्रवादी, रासपाचा पाठिंबाऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी व रासपाने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने आंदोलनाची धार आणखीनच वाढली आहे.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखाने