सोलापूर - गणपती मंदिराचा तब्बल 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
By Admin | Updated: July 21, 2016 08:30 IST2016-07-21T08:30:38+5:302016-07-21T08:30:38+5:30
हिप्परगामधील मशरुम गणपती मंदिराचा तब्ब्ल 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेल्याने गावात खळबळ उडाली आहे

सोलापूर - गणपती मंदिराचा तब्बल 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
>ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 21 - हिप्परगामधील मशरुम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. तब्ब्ल 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेल्याने गावात खळबळ उडाली आहे. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला 25 तोळे सोन्याचा मुलामा होता. सकाळी पुजारी आल्यानंतर कळस चोरीला गेला असल्याचं लक्षात आलं.
बुधवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. याचाच फायदा घेत चोरांनी कळस लांबवला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहे.