शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही

By राकेश कदम | Updated: July 3, 2023 12:11 IST

Solapur: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले.

- राकेश कदम सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही असे स्पष्टीकरण दिले. प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. उमेश पाटील आणि संतोष पवार सोमवारी मुंबईत दाखल झाले. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बुधवार पाच जुलै रोजी सकाळी ११ वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा समन्वय साधनांची जबाबदारी उमेश पाटील आणि संतोष पवार यांच्यासह इतर विभागातील नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर आणि इतर कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार असे सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. साठे यांनी आपण अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील चित्र स्पष्ट होऊ द्या त्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSolapurसोलापूर