शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वजांचं पावित्र्य जपण्यासाठी यंदा बाराबंदीधारकांची नवी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:04 IST

रविवारी विशेष बैठक : तरुण पिढीला मार्गदर्शन करणार हिरेहब्बूंसह इतर मान्यवर

ठळक मुद्देयात्रेच्या आधी नंदीध्वज सरावावेळीही ही आचारसंहिता लागू असणार रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक

रेवणसिद्ध जवळेकर । सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक यात्रेतील पावित्र्य जपण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी एक पाऊल पुढे टाकले असून, बाराबंदीधारकांसाठी नवी आचारसंहिता आणली आहे. यात्रेच्या आधी नंदीध्वज सरावावेळीही ही आचारसंहिता लागू असणार आहे.

या आचारसंहितेची माहिती मानाचे सातही नंदीध्वजांच्या मास्तरांसह बाराबंदी परिधान केलेल्या नंदीध्वजधाºयांना देण्यासाठी रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक बोलाविण्यात आल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

तैलाभिषेक सोहळ्यापासून यात्रेची मुख्य सुरुवात होते. त्यानंतर संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा, होम मैदानावर होम प्रदीपन आणि शोभेचे दारुकाम सोहळा पार पडतो. या चार सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणुकीने पुढे मार्गस्थ होतात. मिरवणूक मार्गावर नंदीध्वजांचे पावित्र्य जोपासण्याचे काम काही जणांकडून होत नाही. हे पावित्र्य जोपासण्याबरोबर मिरवणुका वेळेत पोहोचविण्याची आपल्यावर जबाबदारी असून, ती जबाबदारी यंदा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रविवारी नंदीध्वजधारकांची खास बैठक बोलाविण्यात आल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. बहुतांश मंडळी बाराबंदी घालून मिरवणुकीत सहभागी होतात. बाराबंदी घालून जर कुणी चुकीचे कृत्य करीत असेल तर त्यांना तेथेच तंबी देऊन त्यांच्या अंगावरील बाराबंदी काढून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

बैठकीत होणार व्यसनमुक्तीचा जागर- सराव अन् यात्रा सोहळ्यात नंदीध्वजांचे पावित्र्य राखण्याचे काम नंदीध्वजधारी करीत असतात; मात्र काही जणांकडून पावित्र्य राखले जात नसल्याच्या तक्रारी माझ्या कानावर येत असतात. किमान यात्रेच्या काळात तरी तंबाखू, गुटखा, मावा आदी व्यसनांना फाटा दिला पाहिजे. यासाठीच एक आचारसंहिता तयार केली जाणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. 

अक्षता सोहळा वेळेतच पार पाडू- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख सोहळा असतो. सोहळ्यासाठी सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील आणि लगतच्या कर्नाटक, आंध्रातील भाविक येत असतात. काही भाविक सकाळी ९ वाजल्यापासून संमती कट्टा परिसरात बसलेले असतात. ऊन आणि पाण्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून यंदा अक्षता सोहळा अगदी वेळेत पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.

यात्रेतील पावित्र्य जपण्याचे काम तमाम श्री सिद्धरामेश्वर भक्तांचे आहे. हे पावित्र्य अधिक प्रभावीपणे जपण्यासाठीच आचारसंहिता करण्याची वेळ आली आहे. त्यानुसारच ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील प्रमुख सोहळे यशस्वीपणे पार पाडण्यात येतील.-राजशेखर हिरेहब्बूमानकरी- श्री सिद्धरामेश्वर यात्रा.

टॅग्स :Solapurसोलापूर