शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

सोलापूर सिध्देश्वर यात्रा : हर्र बोला हर्र च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:23 PM

बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष  करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या  यात्रेला तैलाभिषेकाने  शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. 

ठळक मुद्दे सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी  केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला पांढ-या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेतनंदीध्वजाला खोब-याचा हार व बाशिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या

 आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष  करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या  यात्रेला तैलाभिषेकाने  शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.      सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी  केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. पांढ-या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नंदीध्वजाच्या लक्षवेधी मिरवणुकीने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तैलाभिषेकासाठी गुरुवारी मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजाला साज चढविण्यात आला होता. उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजांची  मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,उज्वलाताई शिंदे,आमदार प्रणिती शिंदे,स्मृति शिंदे,सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली .      नंदीध्वज मिरवणुकीत सर्वात पुढे पंचाचार्यांचा ध्वज होता. पाच पिठांचा हा ध्वज प्रतीक  मानण्यात येतो. त्यानंतर सनई-चौघडा , बग्गी , सिद्धेश्वरांची पालखी व त्यापाठोपाठ आकर्षक आणि डौलदारपणाने सात नंदीध्वज मार्गस्थ  होत होते. या यात्रेत झेंडा ग्रुप अत्यंत महत्वाची भूमिका  बजावतात.ज्याठिकाणी नंदीध्वज थांबविले जातात. त्यावेळी सर्वांनी थांबावे असा इशारा या ग्रुपमार्फत लाल झेंडा फडकावून देण्यात येतो. त्यानुसार सिद्धेश्वर भक्त आणि नंदीध्वज मार्गक्रम करीत होते. सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष यावेळी सुरु होता.      नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी व बोललेले नवस फेडण्यासाठी मिरवणूक मार्गावर भक्तांची दुतर्फा झाली होती, तसेच नंदीध्वजाला खोब-याचा हार व बाशिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :Solapurसोलापूर