शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणाºया प्रदुषणाबाबत सोलापुरकरांनी सजग राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:28 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

ठळक मुद्देप्रदूषण हे मानवनिर्मित असून, मानवाने आणलेले संकट आहे. ते रोखणेही मानवाच्याच हातातदेशात प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरकरांनी तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे

बाळासाहेब बोचरे

सोलापूर: प्रदूषण हे मानवनिर्मित असून, मानवाने आणलेले संकट आहे. ते रोखणेही मानवाच्याच हातात आहे, अन्यथा हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. देशात प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरकरांनी तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक नवनाथ अवताडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.प्रश्न: उत्सव आणि उत्साह यातून होणाºया प्रदूषणाकडे आपण कसे पाहता? उत्तर: उत्सव म्हटले की उत्साह हा आलाच. अशावेळी आपण कोणतीच बंधने पाळत नाही. पण यातून निर्माण होणारे प्रदूषण उद्या आपल्यासाठीच जीवघेणे ठरणार आहे याची प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे. उत्सवात कर्णकर्कश आवाज, डीजेचा वापर तसेच मोठ्या आवाजाचे फटाके यामुळे बहिरेपणा, हृदयरोग, रक्तदाब, थकवा यांसारखे आजार उद्भवतात. शोभेच्या दारूपासून निर्माण होणाºया धुरापासून श्वसनाचे आजार होतात. फटाका अािण वाद्यांच्या वापरावर मर्यादा न राहिल्याने ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ झाल्याने याला कुठेतरी निर्बंध घालण्याची गरज होती. म्हणून कायदे करण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. 

प्रश्न: सोलापूर प्रदूषणाच्या बाबतीत देशातील १० प्रमुख शहरांमध्ये आहे, त्याचे कारण काय? उत्तर: याला एक कारण नाही, अनेक कारणे आहेत. सोलापूरची भौगोलिक परिस्थिती कोरडे हवामान, पीकपरिस्थिती आणि रस्त्यावर कचरा टाकण्याची जनतेची मानसिकता ही काही कारणे त्यास कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून प्रदूषण मंडळाने कृती आराखडा तयार केला असून, तो शासनाकडे पाठविला आहे. 

प्रश्न: जलप्रदूषणाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?उत्तर: जिल्ह्यातून वाहणाºया भीमा नदीच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर असून, या नदीचे प्रदूषण उद्भवापासूनच होते. त्यामुळे नमामि चंद्रभागा मोहिमेंतर्गत राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर शहरातील जलप्रदूषण रोखणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना मनपाला दिल्या असून, आजमितीला मनपाकडून तीन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्या माध्यमातून दररोज १०२.५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. 

प्रश्न : प्लास्टिक बंदीमुळे प्रदूषण नियंत्रणात आले काय? उत्तर: होय! प्लास्टिकपासून निर्माण होणारे प्रदूषण जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले असून, यावर घातलेल्या बंदीचे जनतेमधून स्वागत केले जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणDivaliदिवाळी