शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रकल्पाचे नांदेड पोलिसांनाही कुतूहल, पोलिसांच्या पुढाकाराने हिरजची समाधानी अन् स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 11:31 IST

ग्रामीण जनतेच्या समस्या त्यांच्या पातळीवरून सोडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेली समाधानी व स्वयंपूर्ण खेडेगाव दत्तक योजना हिरज  गावाला वेगळे बळ देणारी ठरली आहे.

ठळक मुद्दे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज हे गाव ग्रामीण पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेपोलिसांबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करुन या योजनेची सुरुवात सोलापूर पोलिसांनी राबविलेल्या या प्रकल्पाची नांदेड पोलिसांनी दखल घेतली

अमित सोमवंशी सोलापूर दि ११  : ग्रामीण जनतेच्या समस्या त्यांच्या पातळीवरून सोडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेली समाधानी व स्वयंपूर्ण खेडेगाव दत्तक योजना हिरज  गावाला वेगळे बळ देणारी ठरली आहे. भयमुक्त जीवनासोबतच आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला सक्ष्मीकरण, बेरोजगारांसाठी मदत अशा विविध माध्यमातून पोलिसांनी या गावकºयांना चाकोरी बाहेर जाऊन मदत करणे सुरू केल्याने हिरजने समाधानी आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. दरम्यान, सोलापूर पोलिसांनी राबविलेल्या या प्रकल्पाची नांदेड पोलिसांनी दखल घेतली असून प्रकल्पाचा अभ्यास सुरू केला आहे. नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना पत्र पाठविले आहे.आदर्श गाव संकल्पनेच्या धर्तीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज हे गाव ग्रामीण पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तक घेतले . येथील पोलीस कल्याण विभागात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम यांच्यावर पोलीस  अधीक्षक वीरेश प्रभू यांनी ही जबाबदारी सोपविली. या गावाच्या सर्वांगीण विकासाची योजना राबविण्याच्या नियोजनातूनच समाधानी, स्वयंपूर्ण दत्तक गाव योजनेचा जन्म झाला. सुमारे २ हजार ४०० लोकसंख्या असलेल्या या गावात हिंदू, मुस्लिमांसह मिश्रजातीचे लोक राहतात. या गावाच्या विकासासाठी नेमके काय करता येईल, याचा अभ्यास पोलिसांनी केला. त्यापूर्वी पोलीस आणि जनता यातील अंतर दूर करण्याचे काम त्यांना आधी करावे लागले. पोलिसांबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करुन या योजनेची सुरुवात झाली. आज योजनेच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. देश पातळीवरील पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि संशोधन केंद्राचे चेअरमन पद्मभूषण अनिल काकोडकर, नैसर्गिक शेतीचे शास्त्रज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्यासह आय.आय.टी. दिल्ली आणि आय.सी.ए.आर. दिल्ली या संस्थादेखील मदतीसाठी पुढे आल्या आहेत. पालकमंत्री विजय देशमुख तसेच  मुख्यमंत्र्यांच्यापर्यत या  योजनेची माहिती  पोहोचली. त्यांनी योजनेची दखल घेऊन  माहिती जाणून घेण्यासाठी नाना कदम यांना मुंबईत निमंत्रित केले आहे. ही योजना मुख्यमंत्र्यांच्या पसंतीस उतरली तर राज्यभर लागू केली जाण्याची शक्यता आहे.---------------------असे आहेत उपक्रमगेल्या आठवड्यापासून आरोग्य समस्या सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सत्यसाई मेडिकेअर ही सेवा सुरु केली आहे. आजारी रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. शेती गट, महिला बचत गट, स्वच्छता, गावातील प्रार्थना स्थळ स्वच्छ केले आहेत. १४ नोव्हेंबरपासून गरीब आणि होतकरु मुलींना त्यांच्या शालेय शिक्षणासाठी भारत माता बेटी पढाओ दत्तक योजना सुरु करण्यात येत आहे. यासोबतच सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प, डिजिटल शाळा, आर ओ  प्लांट, वापरासाठी गरम पाणी, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण असे उपक्रम  या योजनेतून राबविले जाणार आहेत. सामाजिक सलोखा कायम राखत पोलिसांच्या पुढाकाराने शाब्दी ग्रुपच्या माध्यमातून मस्जिद स्वच्छ करण्यात आली तर मुस्लीम बांधवांच्या माध्यमातून गावात स्वच्छता झाली. सर्व मंदिरापुढे लोकसहभागातून बाग फुलविण्यात आली आहे.  -----------------------यांनी दिल्या भेटीया योजनेच्या पाहणीसाठी आणि आढाव्यासाठी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू नियमित भेट देतात.  पाणी फाउंडेशनचे राज्याचे मुख्य बाळासाहेब शिंदे, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन लिमिटेडचे रिजनल मॅनेजर रवींद्र कुमार यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. आठवडाभरात पद्मभूषण विजय भटकर येणार आहेत.---------------------------कोणतेही गाव समाधानी, स्वयंपूर्ण करायचे असेल त्या गावामध्ये नेतृत्व तयार व्हायला हवे. राजकारणविरहीत गावातील नागरिकांची मिळून समावेशक समिती तयार  केली जाणार आहे. - नाना कदम   सहायक पोलीस निरीक्षक, 

टॅग्स :Solapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस