Solapur Crime: सोलापूर शहरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला विजापूर रोडवरील सर्वात उंच पनाश अपार्टमेंटवरुन उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ते सतराव्या मजल्यावर थांबून हात जोडून प्रार्थना करत होते, खाली झोपून झोकून देण्याचा प्रयत्न करत होते. सोसायटीमधील एका व्यक्तीने त्यांना समजावून खाली आणले मात्र त्यांच्या हाताला झटका देत पुन्हा ते वर गेले आणि उडी मारल्याचे सांगण्यात आले.
माझ्या गाडीची चावी हरवली
सुनील हे १७ व्या मजल्यावर संशयितरित्या टेहाळताना दिसल्यानंतर त्यांचा व्हिडीओ काहींनी काढला. याची माहिती पनाश अपार्टमेंटच्या वॉचमनला दिली. ही माहिती तेथील ऑफिसमधील एका दिव्यांग इसमाला कळाल्यानंतर त्यांनी थेट १७ वा मजला गाठला. तेथे जाऊन सुनील यांना विचारपूस करत त्यांना खाली आणले. ते दहाव्या मजल्यावर आणून त्यांच्याजवळ विचारणा करताना सुनील हे त्यांना माझ्या गाडीची चावी हरवली आहे असे म्हणत पुन्हा पळत वरच्या मजल्यावर गेले. काही क्षणानंतर पनाशमधील दुसरा इसम वर गेला, पण तोपर्यंत सुनील यांनी खाली उडी मारली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
तोपर्यंत झाला उशीर
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ते पनाशच्या १७व्या मजल्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा राहिल्याचे काही लोकांना दिसून आले. इमारतीवरील व्यक्ती ही सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक सदारंगानी आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीला सदारंगानी हे इमारतीच्या अगदी कोपऱ्यावर येऊन फिरत होते. रस्त्यावरून पाहणाऱ्या व्यक्तींकडून ही माहिती एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचली.
मृत सुनील हे दुपारी २.४७ वाजता कार घेऊन आता आले. कार थेट पनाश अपार्टमेंटच्या पार्किंगजवळ थांबली. कारची नोंद वॉचमनने घेतली. पण सुनील कोठे जात आहेत, याची विचारणा वॉचमनने केली नाही. तेथील लिफ्टमध्ये बायोमॅट्रिक आहे. यामुळे ते पायरी चढत १७ व्या मजल्यापर्यंत गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील हे सतराव्या मजल्यावरून थेट खाली पडले. ते जेव्हा खाली मोकळ्या जागेत पडले त्यावेळी मोठा आवाज आला. तेव्हा त्याजवळील फ्लॅटमधील एक महिला गॅलरीमधून बाहेर येऊन पाहताच त्यांना सदारंगानीच्या आत्महत्येचा प्रकार दिसला. यावेळी त्यांचा मेंदू बाहेर पडला होता, अनेक ठिकाणाहून रक्तबंबाळ झाले होते हे पाहून महिला किंचाळतच आत गेली. यामुळे काहीकाळ तर परिसरात घबराट पसरली होती
Web Summary : Solapur's Sunil Sadarangani, owner of Multani Bakery, tragically jumped from a 17th-floor apartment after praying. He was briefly stopped, but sadly, he proceeded with suicide. Witnesses reported his desperate actions before the fatal leap.
Web Summary : शोलापुर के मुल्तानी बेकरी के मालिक सुनील सदारंगानी ने प्रार्थना के बाद 17वीं मंजिल के अपार्टमेंट से कूदकर दुखद रूप से आत्महत्या कर ली। उन्हें कुछ देर के लिए रोका गया, लेकिन दुख की बात है कि उन्होंने आत्महत्या कर ली। प्रत्यक्षदर्शियों ने घातक छलांग से पहले उनकी हताश कार्रवाई की सूचना दी।