शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर दिला नकार, तरुणाविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: May 13, 2024 18:06 IST

Solapur News: जवळकीता साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पिडित तरुणी गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला.

- विलास जळकोटकर सोलापूर - जवळकीता साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पिडित तरुणी गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला. सन २०२० पासून आजतागायत हा प्रकार घडल्याची तक्रार पिडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मनोद्दिन मुल्ला (नई जिंदगी, सोलापूर) याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीचे सन २०२० मध्ये ओळखीतून प्रेमसंबंध जुळले. आरोपीने पिडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. संबंधीत कृत्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचाराचे कृत्य केले.

या प्रकारामुळे सदर पिडिता चार महिन्याची गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. यावर पिडितेने आरोपीला लग्नासंबंधी विचारणा केली. यावर त्याने ‘मी आता लगेच लग्न करु शकत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणून निघून गेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यामुळे कोलमडलेल्या पिडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी पिडितेचे गाऱ्हाणं ऐकून तक्रार नोंदवून घेतली. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी