सोलापूरला पावसाने झोडपले, शहर जलमय, शेकडो घरात शिरले पाणी
By Admin | Updated: June 12, 2017 14:27 IST2017-06-12T14:27:38+5:302017-06-12T14:27:38+5:30
-

सोलापूरला पावसाने झोडपले, शहर जलमय, शेकडो घरात शिरले पाणी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ - सोलापूर शहर व परिसरात काल रात्रभर झालेल्या पावसामुळे शहर जलमय झाले आहे. शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
दरम्यान, सोलापूर मध्ये जुन महिन्यातील पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसानं या महिन्याची ११० मि.मि पावसाची सरासरी परवाच ओलांडली आहे. सोमवार आज पहाटे २ ते ६ पर्यत ६१़२ मि.मि म्हणजे अडीच इंच पाऊस झाला आहे.
जुन २०१७ मध्ये आज सकाळ पर्यत झालेल्या नोंदी नुसार १९०़९ मि.मि पाऊस सोलापूरात झाल्याची नोंद हवामान खात्याकडे आहे.
गत वर्षी या १२ दिवसात केवळ ४ मि.मि पाऊस झाला होता.कालचा आणी गेल्या काही दिवसातील पाऊस जिल्ह्यात सर्वदूर व दमदार झाले आहे.
सोलापूर शहरात अनेक वस्त्या वसाहतीत पाऊसाचे पाणी घुसले आहे. पाणी निचरा करण्याचे काम सुरु आहे.