शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

solapur politics : माळशिरसमध्ये उमेदवार कुणीही असला तरी केंद्रबिंदू मोहिते-पाटीलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:48 PM

राजीव लोहोकरे ।  अकलूज : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दोन वेळा आ. हनुमंतराव डोळस ...

ठळक मुद्देमाळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला २००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षितया मतदारसंघात गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंतराव डोळस हे निवडून आले

राजीव लोहोकरे । अकलूज : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दोन वेळा आ. हनुमंतराव डोळस निवडून आले असून, आता हॅट्ट्रिक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत़ तसेच मुंबईचे लक्ष्मण पाखरे हे देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत़ भारतीय जनता पक्षाच्या वतीने माळशिरस पंचायत समिती सदस्य अजय सकट, रामभाऊ जगदाळे, अनंत खंडागळे, ज्ञानेश्वर कांबळे आदी इच्छुक आहेत.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे़ २००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे़ त्यापूर्वी मोहिते-पाटील विरुध्द विरोधक अशाच निवडणुका झाल्या आहेत. या मतदारसंघात गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंतराव डोळस हे निवडून आले आहेत.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तम जानकर यांनी आपल्या सहकाºयांसह भाजपात प्रवेश केला. मात्र त्यानंतर त्यांचा करिष्मा कुठे दिसून आला नाही़ त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळविल आहे़ आगामी निवडणुकीसाठी विद्यमान आ़ हनुमंतराव डोळस यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे़ शिवाय राष्ट्रवादीकडूनच मुंबईचे लक्ष्मण पाखरे हे देखील इच्छुक आहेत़ त्यांनी उमेदवारांसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार व खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी जवळीक साधत पोस्टरबाजी केली आहे. पुण्याचे रामभाऊ जगदाळे यांनी देखील माळशिरसमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहे. मात्र त्यांचा अद्याप पक्ष नक्की नाही.

तसेच तरंगफळचे तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर (माऊली) कांबळे, अतुल सरतापे, गत निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनंत खंडागळे हे भाजपाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देण्यासाठी एकास एक उमेदवार म्हणून सध्या तरी शिवसेनेच्या गोटातून एकही नाव पुढे आले नाही, मात्र संधी मिळाल्यास गत निवडणुकीत मुंबई येथील शिवसेनेचे लक्ष्मण सरवदे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPoliticsराजकारणElectionनिवडणूक