शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Politics; सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन देशमुखांतील सुंदोपसुंदी कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:00 IST

राकेश कदम  सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील ...

ठळक मुद्देगट-तटाचे राजकारण : पक्षाच्या कार्यक्रमात एकमेकांना डावलण्यावर भरलोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले

राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील शक्ती प्रमुखांच्या संमेलनात सहकारमंत्री गटाला टाळण्यात आले होते. तर रविवारी सोशल मीडियावरील ‘नमो अगेन’ या कार्यशाळेत पालकमंत्री गटाला डावलण्यात आल्याचे दिसून आले. 

भाजपच्या सोलापूरलोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी रविवारी सोशल मीडियासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भाजपाच्या महाराष्ट्र राज्य आयटी सेलचे प्रमुख आशिष मेरखेड यांनी मार्गदर्शन केले. खासदार अमर साबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, हेमंत पिंगळे, रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर पालकमंत्री गटाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. यासंदर्भात पालकमंत्री गटातील नगरसेवकांना विचारल्यानंतर त्यांनी कोण कुठे कार्यक्रम घेतोय. आमच्या पक्षाचं काय चाललंय कळत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यशाळेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी नेमकं काय काय करता येईल, याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वी शिवदारे मंगल कार्यालयात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. पण या कार्यक्रमात भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांना बोलावण्यात आलेले नव्हते. आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊनही आम्हाला निमंत्रण दिले जात नाही, याबद्दल तक्रार करणार असल्याचे महापौर बनशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शक्ती प्रमुखांच्या संमेलनाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनुपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते तर जायचे कसे, असा सवाल पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला होता. पण ही निमंत्रणे निवडणूक वॉर रूममधून दिली जात असल्याचे सांगून सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुठे आणि कोणती कार्यशाळा झाली, याबद्दल मला माहिती नाही. आम्ही तर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. - संजय कोळी, पक्षनेता. 

कोणत्या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचे हे ठरलेले आहे. प्रदेशाच्या निर्णयाप्रमाणे लोकांना निमंत्रणे दिली जात आहेत. सोशल मीडियासंदर्भातील कार्यशाळा ही कार्यकर्त्यांसाठी होती. त्यामुळे यात निमंत्रणाचा मुद्दा गौण ठरतो. - प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण