शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

solapur politics; भाजपचा आत्मविश्वास वाढणार; म्हणे दोन देशमुखांचा लगाव कायम राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत जाताना हा एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शहर आणि जिल्हा भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढला एरवी एकमेकांचे तोंड न पाहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मोदींच्या सभामंचावर एकमेकांशी दिलखुलासपणे बोलले.

राकेश कदम 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शहर आणि जिल्हा भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढला आहे. या सभेमुळे दोन देशमुखांमधील अंतर कमी होईल, असा विश्वासही शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्ग आणि रे नगरमधील ३० हजार गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सोलापुरात जाहीर सभा घेतली. हा कार्यक्रम प्रशासकीय असला तरी भाजप नेत्यांनी त्याला राजकीय स्वरूप दिले. मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय टोलेबाजी केली. ‘चौकीदार ही चोर है’ या काँग्रेसच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मिशेल मामाचा नवा मुद्दाही सोडून दिला. 

या सभेच्या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढली. प्रभागनिहाय बैठका घेतला. एरवी एकमेकांचे तोंड न पाहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मोदींच्या सभामंचावर एकमेकांशी दिलखुलासपणे बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत जाताना हा एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे देशमुखांचे मंचावरील दिलखुलास बोलणे पुढील काळातही कायम राहील, असा आशावाद भाजप कार्यकारिणीतील नेते व्यक्त करीत आहेत. 

 मोदींनी आपल्या भाषणात शेतकरी, साखर कारखानदार, वस्त्रोद्योग या मुद्यांना स्पर्श केला नसल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र स्मार्ट सिटीतील विकासकामे आणि राजकीय टोलेबाजीमुळे एक राजकीय वातावरण तयार करण्यात मोदी यशस्वी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. 

माकपची मते कोणाच्या कोटात जाणार- माकपचे माजी आमदार नरसय्या आडम रे नगरमधील ३० हजार घरांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातही संघर्ष करीत होते. मतपेटीच्या राजकारणामुळे शहरातील काँग्रेस नेत्यांनी या प्रकल्पात अडथळे आणले, असा आरोप आडम मास्तर करीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. त्यामुळे आडम मास्तरांनी काल झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. मास्तरांचा काँग्रेससोबत सुरू असलेला संघर्ष आणि कालचे भाषण पाहता लोकसभा निवडणुकीत माकपची मते कोणाच्या गोटात जाणार याबद्दल उत्सुकता आहे. 

मोदींची सभा अभूतपूर्व झाली. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. मी पार्टीमध्ये २९ वर्षे काम करतोय. मोदींचे स्वागत करायची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही मागील सहा महिन्यांपासून तयारीला लागलोय. जो बूथ जिंकतो तो निवडणुका जिंकतो. मोदींच्या सभेसाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. अंतर्गत बाबीमुळे एक मरगळ आली होती ती दूर झाली आहे. दोन देशमुखांमध्ये एकोपा राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. - प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी