शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

Lok Sabha Election 2019; सोलापूरकर युवक म्हणतात, मतदान करणारच; पण व्यापक विचारांतीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:07 IST

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरातील युवा वर्गामध्येही चर्चा सुरू झाली; पण ही चर्चा राजकारणावर मुळीच नव्हती. मतदान ...

ठळक मुद्देलोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरातील युवा वर्गामध्येही चर्चा सुरूआम्ही मतदान करणारच, असा निर्धार

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरातील युवा वर्गामध्येही चर्चा सुरू झाली; पण ही चर्चा राजकारणावर मुळीच नव्हती. मतदान नक्की करायचं, पण नेमक्या कोणत्या मुद्यावर आपलं बहुमूल्य मत द्यायचं ? देशापुढील महत्त्वाचे प्रश्न कोणते?...याबाबतची चर्चा युवकांमधून ऐकायला आली. त्यानंतर ‘लोकमत’ ने काही तरूणांशी संवाद साधायचे ठरविले...आम्ही मतदान करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला; पण व्यापक विचार करून अतिशय गंभीरतेने मतदान करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विकास, पायाभूत सुविधा, देशाचे संरक्षण,  रोजगार, सहिष्णुता हे मुद्देही आम्हाला महत्त्वाचे वाटतात. मतदान करताना या मुद्यांचा नक्की विचार करणार आहोत, असे युवक म्हणाले.

या युवकांना आवडता पक्ष कोणता? आवडता नेता कोणता? कोणत्या राजकीय विचारसरणीशी निगडीत आहात काय? आदी प्रश्न विचारले. मुलांनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, रिपाइं नेते रामदास आठवले,  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे  आमचे आवडते नेते असल्याचे युवकांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे विचारले असता अनेकांनी देशाचे रक्षण,  दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती या मुद्यावर आम्ही मतदान करणार असल्याचे ते म्हणाले.

देशाचे संरक्षण आणि विकास या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. शांतता असेल तरच विकास होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत देशाचं संरक्षण करण्याचे मुख्य धोरण असलेल्या  सरकारला आपले प्राधान्य असेल. देश संरक्षण हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. - पवन जाधव 

देशाचे रक्षण महत्त्वाचे आहे.अतिरेकी कारवाईमुळे दहशत निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत मातृभूमीचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. देशसेवेला आवश्यक असे धोरण असणाºया मुद्यावरच आपले मतदान असणार आहे.- विद्या गायकवाड

देशाच्या विकासाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विकासाला प्राधान्य देणाºया विषयावरून आपले मतदान असेल. विकास झाला तरच प्रगती होणार आहे. त्यामुळे विकासाच्या विषयावरूनच मतदानाचे स्वरूप असेल.- राहुल बिराजदार

भारताचा एकवेळेस विकास थांबला तर चालेल पण देश संरक्षणामध्ये कोणतीही कमतरता नको,कारण देशामधील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विकास या गोष्टी थांबल्या तरी एकवेळी चालेल. देश महत्त्वाचा असून  देश टिकला तरच या गोष्टीना महत्त्व असेल. देशाचे संरक्षण करणाºया धोरणाच्या विषयावरून मतदानाचे प्राधान्य असणार आहे.-अनुप कुलकर्णी

देशाच्या संरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहेच. पण देशातील तरुणांना रोजगारही मिळणे महत्त्वाचे आहे. रोजगार व स्वयंरोजगार वाढला तरच खºया अर्थाने देशाची व समाजाची प्रगती होणार आहे. येत्या निवडणुकीत याच विषयाला आपले प्राधान्य असेल. - ओम कुलकर्णी

देश सुरक्षित तर जनता सुरक्षित़ देशांतर्गत प्रश्न केव्हाही सुटतील, त्यासाठी सरकार सक्षम आहे़ जनताही तेवढीच सक्षम आणि समजूतदार आहे़ परंतु बाजूच्या देशापासून धोका कसा थांबवता येईल़ ज्या देशाची संरक्षण यंत्रणा सक्षम तोच देश आघाडीवर आहे़ देशाला मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रे हवी आहेत़ हाच मुद्दा समोर ठेवून योग्य उमेदवाराला मतदान करणार आहे़  

- श्रीमंत ऐवळे 

देशात दुष्काळसदृश स्थिती आहे़ ग्रामीण भागात खूप मोठ्या समस्या आहेत़ काही शहरं स्मार्ट होत असताना अनेक खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही़ खेडी समृद्ध तर देश समृद्ध़ केवळ शहर स्मार्ट होऊन देशाचा विकास होणार नाही़ ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजा सोडविण्यात आजही आपण स्वयंपूर्ण नाही़ हाच मुद्दा समोर ठेवून ग्रामीण विकास साधण्यासाठी मतदान करणार आहे़      - सिद्धेश्वर पाटील

देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे़ रोजगार देणारे सरकार आम्हाला हवे आहे़ ग्रामीण भागातील तरुण गाव सोडून शहरात गेला आहे आणि शहरातला बेरोजगार तरुण मेट्रोसिटीत जातोय़ रोजगाराच्या मुद्यावर प्रत्येक व्यक्ती गंभीर आहे़ हाताला रोजगार निर्माण झाला तरच गुन्हेगारी कमी होणार आहे आणि त्या शहराचा विकास साधणार आहे़ म्हणून रोजगाराच्या मुद्यावर मतदान करणाऱ             - मेघा लंबे 

काही शहरांचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे़ गुजरात आणि काही राज्यांत वेगाने विकासकामे सुरू आहेत़ महाराष्ट्राला अनेक चांगले राजकारणी आणि नेते मिळूनही आपला जिल्हा विकासात खूप मागे आहे़ आपल्या गावचा विकास झाला तरच आपला विकास होणार आहे़ ज्या शहराचा विकास चांगला त्या शहरात रोजगार मोठ्या प्रमाणत आहे़ हाच धागा पकडून मतदान करणाऱ

- सारिका काळोखे

सर्वसामान्यांचा विकास साधणारे  सरकार हवे आहे़ सर्वसामान्य व्यक्ती विकासाचा केंद्रबिंदू ठरला पाहिजे़ खेड्यात वीज, पाणी आणि कृषी विकास साधणारे सरकार हवे आहे़ शहरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हायला हवा़ असेच चित्र राहिले तर देशाचा विकासदर घटणार आहे़ विकासदर उंचावणारे सरकार  हवे आहे, अशा सरकारसाठी मतदान करणार  आहे़   - प्रभाकर शिरढोणकर 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण