शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पंढरपुरातील पेालीस नाईकास रंगेहात पकडले

By appasaheb.patil | Updated: May 10, 2024 13:08 IST

Solapur News: दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलिस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

- आप्पासाहेब पाटीलपंढरपूर - दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलिस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही सापळा कारवाई शुक्रवार १० मे २०२४ रोजी यशस्वी झाली. याप्रकरणी पेालिस नाईक याच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

वैजिनाथ संदीपान कुंभार (वय ५२, रा. अर्थव बिल्डिंग, ब्लॉक नंबर २०७, पुजारी सिटी, इसबावी, पंढरपूर) असे लाच स्वीकारलेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी पोलिस नाईक कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० हजार रूपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्वत:त स्वीकारल्यावरून पोलिस नाईकास रंगेहात पकडण्यात आल्याचे एसीबी, सोलापूरने प्रेसनोटव्दारे सांगितले आहे. हा सापळा पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पेालिस अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलिस नाईक स्वामीराव जाधव, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी