वेतनासाठी सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: February 27, 2017 15:53 IST2017-02-27T15:53:09+5:302017-02-27T15:53:09+5:30
वेतनासाठी सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

वेतनासाठी सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
वेतनासाठी सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
सोलापूर : सोलापूर हानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्या कारणाने पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलन करीत काळ्या फिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला़ यात महापालिका कामगार संघटना व महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या सदस्यांचा सहभाग होता़
सोलापूर महानगरपालिकेची निवडणुक आताच झाली़ संपूर्ण जानेवारी महिना हा निवडणुक कामातच गेला़ निवडणुका कामात कोणताही हलगर्जीपणा न करता दिवसरात्र काम करून महापालिका निवडणुक पार पाडल्या़ मात्र आज फेबु्रवारी महिना संपत आला तरी जानेवारी महिन्याचा पगार मिळाला नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले़ येत्या दोन दिवसात वेतन मिळाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ यावेळी मनपा प्रशासनास निवेदन देण्यात आले़