सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला लागले १२ विद्यमान नगरसेवक
By Admin | Updated: February 19, 2017 17:08 IST2017-02-19T17:08:25+5:302017-02-19T17:08:25+5:30
सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला लागले १२ विद्यमान नगरसेवक

सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला लागले १२ विद्यमान नगरसेवक
सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला लागले १२ विद्यमान नगरसेवक
सोलापूर : शिवसेनेने १०२ पैकी १०० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत़ यातील ८५ उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवित असून, उर्वरित १५ उमेदवारांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे़ पुरस्कृत केलेल्या बहुतांश उमेदवारांना बॅट हे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे महापालिकेच्या या सामन्यात शिवसेना कशी बॅटींग काढून किती धावा काढणार याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे़
महेश कोठे यांची ताकद सेनेला लाभल्यामुळे त्यांनी अनेकांच्या गळ्यात सेनेचे शिवबंधन बांधले़ सुभाष डांगे, विनायक कोंड्याल, देवेंद्र कोठे, कुमुद अंकाराम हे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत तर इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, रेखा अंजीखाने, सुवर्णा हिरेमठ हे भाजपचे विद्यमान नगरसेवक त्यांना सेनेमध्ये आणून कोठे यांनी त्यांना उमेदवारी देऊ केली एवढेच नव्हे तर विष्णू निकंबे, महादेव बिद्री, रमेश व्हटकर यासह अनेकांना सेनेत खेचून आणल्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे़ त्यामुळे सेनेचे किती नगरसेवक निवडून येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे़ सेनेच्या संपूर्ण उमेदवारी यादीवर कोठे यांची छाप आहे़ शिवाय कोठे यांचे घरातील तसेच नातेवाईक यांचा विचार करता डझनभर उमेदवार कोठे यांचे नातेवाईकच आहेत.सेनेने मुंबईवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्यामुळे राहुल शेवाळे शिवाय एकही सेनेचा नेता सोलापुरात प्रचारासाठी आला नाही़ पालकमंत्र्यांना टार्गेट करणे तसेच पुढील विधानसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणण्यावर कोठे यांनी भर दिल्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपला कोठेसेनेबरोबर अटीतटीचा सामना करावा लागत आहे़