सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार
By Admin | Updated: January 28, 2017 12:46 IST2017-01-28T12:46:45+5:302017-01-28T12:46:45+5:30
सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार

सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार
सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार
सोलापूर : आॅनलाईन लोकमत सोलापूर
जनतेच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या संभाजी आरमारने महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. शुक्रवारी शिवस्मारक सभागृहात संभाजी आरमारने आठ जागा लढविण्याचा रणशिंग फुंकले आहे.
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. शहरातील सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, परिवहन, स्मार्ट सिटी हे विषय ऐरणीवर घेण्याचा निर्णय या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यात प्रभाग क्र. १४-ड मधून संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना लोकशाही व्यवस्थेमध्ये केवळ रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत राहण्यापेक्षा निवडणुकीच्या माध्यमातून या लढ्याला सनदशीर स्वरुप देण्याकरिता परिश्रम करण्याचा दृढनिश्चय केला.
या मेळाव्यास संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, जिलहा संघटक अनंतराव नीळ, कामगार संघटना प्रमुख संजय पारवे, रिक्षा संघटना प्रमुख अमर गुंड, संपर्क प्रमुख सागर संगवे, राज दवेवाले, तुषार जक्का, देवा वीटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.