सोलापूर मनपा निवडणुकीत माकपाने उतरवले २४ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: January 28, 2017 12:38 IST2017-01-28T12:38:05+5:302017-01-28T12:38:05+5:30
सोलापूर मनपा निवडणुकीत माकपाने उतरवले २४ उमेदवार रिंगणात

सोलापूर मनपा निवडणुकीत माकपाने उतरवले २४ उमेदवार रिंगणात
सोलापूर मनपा निवडणुकीत माकपाने उतरवले २४ उमेदवार रिंगणात
सोलापूर : आॅनलाईन लोकमत सोलापूर
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने ६ प्रभागातून एकू ण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत़ त्यापैकी २२ उमेदवार हे निश्चित करण्यात आले आहेत़ त्यांची यादीही तयार करण्यात आली आहे़ यावेळी पक्षाने उच्चशिक्षितासह अल्पसंख्याक,मागासवर्गीय अशा अनेक घटकांना निवडणुकीत उतरवले आहे़ यामध्ये स्वत:ची मुलगी आणि पत्नी यांचाही समावेश असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शुक्रवारी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेस सिद्धप्पा कलशेट्टी, अॅड़ एम़ एच़शेख, शेवंता देशमुख, नसीमा शेख, व्यंक टेश कोंगारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ यंदा महापालिका निवडणुकीत नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनीताई आडम आणि मुलगी अरुणा आडम या दोघीही उतरल्या आहेत़ पक्षाच्या कार्यक्रमात त्या यापूर्वीपासून सक्रिय असल्याने त्यांना संधी देण्यात आली असून, ही घराणेशाही नसल्याचे आडम यांनी सांगितले़ महापालिके शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघातून यंदा माकपाचे उमेदवार असतील़ या विषयावर लवकरच बैठक होणार आहे़ निवडणुकीची जबाबदारी ही पक्षाचे नेते सिद्धप्पा कलशेट्टी यांच्यावर सोपवण्यात आली आहे़
अॅड़ एम़ एच़ शेख हे लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून त्यामध्ये ३० हजार नव्याने घरकूल, शहराला दररोज पाणीपुरवठा, एलबीटीचा फेरविचार आदी मुद्दे असतील असे आडम म्हणाले़
६ प्रभागांतून २२ उमेदवार निश्चित़़़
४प्रभाग ९ : अ- अरुणा नरसय्या आडम (ना़मा़स्त्री), ब-सुनंदा सिद्धेश्वर बल्ला (स्त्री), क- व्यंकटेश कोंगारी (सर्व़), ड-बाळासाहेब तेलंग (सर्व़)
४प्रभाग - १३: अ-भालचंद्र कु रमय्या म्हेत्रे (अ़जा़), क- कामिनीताई आडम (स्त्री), ड-मुरलीधर सुंचू (सर्व), ड-नसीमा शेख (ना़मा़स्त्री),
४प्रभाग १४ : क - महिबूब हिरापुरे (सर्व़), ड- युसूफ शेख (मेजर)(सर्व़)
४प्रभाग १६: अ- संध्या कांबळे (अ़जा़स्त्री), ब-अमित मंचले (ना़मा़), क-डॉ़ नाजीया मुलाणी (स्त्री), ड-शंकर म्हेत्रे (सर्व)़
४प्रभाग १७-उज्ज्वला गजाकोश (अ़जा़स्त्री),ब-अमर कस्तुरी (ना़मा़), क-शांताबाई म्हेत्रे (स्त्री), ड-अकील शेख(सर्व)
४प्रभाग १८ : अ-रहिम नदाफ (ना़मा़), ब-शेवंताबाई देशमुख (ना़मा़स्त्री), क- नलिनीताई कलबुर्गी (स्त्री), ड-नागेश माने (सर्व).
त्रिशंकू परिस्थिती...
च्महापालिकेत कोणाची सत्ता येईल हा मुद्दा छेडला असता, ‘कोणा एकाची सत्ता येणार नाही, त्रिशंकू परिस्थिती असेल’असा दावा नरसय्या आडम यांनी केला़ संयुक्त विकास आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ पक्षाने सकारात्मक भूमिका घेतली आहे़ या आघाडीत माकप, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर), भारिप बहुजन महासंघ, भाकप, समाजवादी जन परिषद असे एकत्रित येऊन ५८ जागा लढवण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले़