सोलापूर महापालिका निवडणुक : ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या १८ उमेदवारांची यादी जाहीर

By Admin | Updated: January 30, 2017 21:48 IST2017-01-30T21:48:45+5:302017-01-30T21:48:45+5:30

सोलापूर महापालिका निवडणुक : ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या १८ उमेदवारांची यादी जाहीर

Solapur Municipal Election: List of 18 candidates for AIMIM party | सोलापूर महापालिका निवडणुक : ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या १८ उमेदवारांची यादी जाहीर

सोलापूर महापालिका निवडणुक : ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या १८ उमेदवारांची यादी जाहीर

सोलापूर महापालिका निवडणुक : ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या १८ उमेदवारांची यादी जाहीर
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला शहराचा विकास हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत. निवडणुकीत सर्व जातीच्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून १८ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती हैदराबाद येथील आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) आमदार मौजम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुरात आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. वास्तविक पाहता शहराचा ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते त्या पद्धतीने झाला नाही. शहरासह हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत. नागरिक विविध मूलभूत सेवा मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. विकासाचा मुद्दा हा एमआयएमचा मुख्य अजेंडा असणार आहे. निवडणुकीत आजवर सत्ता भोगलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस याचबरोबर जातीयवादी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेसारख्या पक्षांना रोखणे हा एमआयएमचा मुख्य उद्देश आहे. निवडणुकीत मुस्लीम-दलित, एन.टी., एस.टी., ओ.बी.सी. आदी प्रवर्गातील लोकांना सोबत घेऊन काम करणार आहोत. आमच्या पक्षाची पहिली निवडणूक असून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे, असेही यावेळी आमदार मौजम खान यांनी सांगितले.
जातीवादी शक्ती वाढत आहे, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संगनमत आहे. आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन काम करीत आहोत, विकासकामाच्या गप्पा मारून सत्तेतील लोक जनतेची दिशाभूल करीत आहेत. येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, सोलापूरच्या विकासावर भर देतील, असे मत यावेळी एआयएमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी व्यक्त केले.
एआयएमआयएमचे उमेदवार जाहीर......
च्प्रभाग क्र. १४- रियाज खरादी, सलीम मिस्त्री, वाहिदा बानू शेख- माजी नगरसेवक, प्रभाग क्र. १५- उमेर नजीर सय्यद, प्रभाग क्र. १६- गाजी इस्माईल जहागीरदार, सलीम शेख, नसीमा साहीर लवंगे, शिल्पा किरण निकंबे, प्रभाग क्र. १७- अब्दुल वाहिद पीरसाब नदाफ- माजी नगरसेवक, वाहिद गफूर बिजापुरे, नूतन प्रमोद गायकवाड (रिपाइं- पी. जी.), प्रभाग क्र. २१- तौफिक इस्माईल शेख, अजहर अहमद हुंडेकरी, शहेनाज महिबुब शेख, प्रभाग क्र. २२- जुबेर नजीर शेख, अ‍ॅड. रियाज मंगोली, पूनम अजित बनसोडे, आस्मा वसीम शेख.

Web Title: Solapur Municipal Election: List of 18 candidates for AIMIM party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.