सोलापूर महानगरपालिका निवडणुक : भाजपात इच्छुक उमेदवारात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ...

By Admin | Updated: January 25, 2017 18:29 IST2017-01-25T18:29:59+5:302017-01-25T18:29:59+5:30

सोलापूर महानगरपालिका निवडणुक : भाजपात इच्छुक उमेदवारात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ...

Solapur Municipal Election: BJP wants a strong show in the candidate ... | सोलापूर महानगरपालिका निवडणुक : भाजपात इच्छुक उमेदवारात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ...

सोलापूर महानगरपालिका निवडणुक : भाजपात इच्छुक उमेदवारात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ...

सोलापूर महानगरपालिका निवडणुक : भाजपात इच्छुक उमेदवारात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ...
सोलापूर : आप्पासाहेब पाटील
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी मनपाच्या १३ प्रभागातील २१४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या़ भाजपकडून उमेदवारी मिळावी, या उद्देशाने इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उपस्थित नेत्यांसमोर आपला प्रभाव दाखविला़
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १ ते १३ मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी आजोबा गणपतीसमोरील महावीर मंगल कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा़ शरद बनसोडे, भाजपचे शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, विक्रम देशमुख, हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा यांच्यासह अन्य भाजपाचे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते़ यावेळी प्रभाग ५ अ मधून अरूणा सुर्यकांत बाबरे, प्रभाग ३ सर्वसाधारणातून विरेंद्र हिंगमिरे यांच्यासह नागेश वल्याळ, चन्नवीर चिट्टे, जयराज नागणसुरे आदी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या़
--------------------
शिस्तप्रिय पक्षाच्या बेशिस्त मुलाखती
सकाळी दहा वाजल्यापासून महावीर मंगल कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करताना एकच गर्दी केली. ज्या सभागृहात मुलाखती घ्यायच्या तेथेही सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आपापल्या नेत्याचा जयघोष सुरू केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. शरद बनसोडे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासमोरच हा गोंधळ सुरू होता़ त्यामुळे त्यांना उमेदवारांच्या मुलाखतीत ना प्रश्न विचारता येत होते ना त्यांनी दिलेले उत्तर ऐकू येत होते. अनेकदा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करूनही कार्यकर्ते शांत होत नव्हते. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ब्रेकचे निमित्त करून काही वेळासाठी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले़ त्यापाठोपाठ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही मुलाखती सोडून शेजारच्याच एका कक्षात थोडी उसंत घेतली व पुढच्या मुलाखती कक्षात घेण्यासाठी तेथेच खासदारांना बोलावून घेतले. मात्र इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कक्षासमोरही मोठी गर्दी केली. थोड्या वेळात पालकमंत्री मुलाखत सुरू असलेल्या सभागृहात पोहोचले तेव्हा मुलाखती कक्षात सुरू असल्याचा निरोप त्यांना मिळाला. त्यामुळे ते पुन्हा कक्षाकडे निघाले. मात्र बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आणि रेटारेटी इतकी होती की, पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांना गर्दी हटवून त्यांना वाट काढून द्यावी लागली. अशा गोंधळातच आज प्रभाग एक ते तेराच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उरकल्या. मात्र उद्या असा गोंधळ होऊ देऊ नका, अशा सूचना मंत्र्यांनी शहर पदाधिकाऱ्यांना दिल्या.
--------------------
वाहतूक व्यवस्था खोळंबली
भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या माणिक चौकातील महावीर मंगल कार्यालयात मुलाखती होत्या़ या मुलाखतीसाठी इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोठा लवाजमा आणला होता़ महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या गर्दीने या मार्गावरील विजापूर वेस व टिळक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती़ त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक व्यवस्था खोळंबली होती़ पोलीस यंत्रणा होती; मात्र अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते़
--------------------
जेथे ज्यांचे प्राबल्य तेथे त्या पक्षाचा उमेदवाऱ़़
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व चांगले आहे़ या मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपला मनपा निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या आहेत़ त्यामुळे युतीच्या नियमात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात जेथे भाजपचे प्राबल्य जास्त आहे तेथे शिवसेनेला जागा सोडणार नाही़ जेथे शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे तेथे भाजप जागा सोडेल़ भाजपमधील कोणताही उमेदवार बंडखोरी करणार नाही़ युती तुटल्यास भाजपचा कोणताही उमेदवार शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असेही ठामपणे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़
कोठे यांचा भाजपात येण्याचा विचार होता़़़
मध्य विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे महेश कोठे यांचा भारतीय जनता पक्षात येण्याचा विचार होता़ या मनपा निवडणुकीवेळीही त्यांनी अनेकवेळा भाजपात येण्याचा प्रयत्न केलेला आहे़ आमचेही म्हणणे होते की, महेश कोठे यांनी भाजपात यावे; मात्र आता वेळ खूप झालेला आहे़ आता त्यांनी येणं व आम्ही घेणं हे आम्हाला सोयीस्कर वाटत नाही, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
---------------
आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती व्हावी, यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत़ तरीही जागावाटपावरून युती न झाल्यास भाजप स्वबळावर लढणार आहे़ मनपावर भाजप सत्ता काबीज करेल व महापालिकेला चांगले दिवस येतील़ निवडून येण्याच्या तत्त्वावर युती शक्य़ युती न झाल्यास शिवसेनेच्या विरोधात खंबीरपणे उभे राहणाऱ विकासकामांच्या जोरावर भाजपला अच्छे दिन येतील़
विजयकुमार देशमुख,
पालकमंत्री, सोलापूर जिल्हा़
-------------
भाजपची लाट अद्यापही सगळीकडे आहे़ त्यामुळे प्रत्येकालाच मनपा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. भाजपच्या कट्टर उमेदवारांच्याच मुलाखती घेतल्या जात आहेत़ आगामी मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार हे नक्की आहे़ आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत़ आघाडी झाली तर सोबत, नाही तर विरोधात लढण्यास भाजप सक्षम आहे़ सक्षम नेतृत्व, पारदर्शक कारभार, चांगले प्रशासन, विकासकामांवर जास्तीचा भर देण्याचा आमचा मानस आहे़
-शरद बनसोडे,
खासदार, सोलापूऱ
-------------------
महेश कोठे यांची गाडी चुकली
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या महेश कोठे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे, असा प्रश्न खा़ शरद बनसोडे यांना विचारला असता आता त्यांची गाडी चुकली़़़ चान्स होता पण काहीच होत नाही, असा उपरोधिक टोला लगावला़
----------------
भाजपचे १०२ उमेदवार ठरले़़़
आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेची आघाडी होईल की नाही, याबाबत अद्याप संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़ मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनपाच्या २६ प्रभागांसाठी १०२ उमेदवारांची यादी तयार ठेवली असल्याची माहिती खा़ शरद बनसोडे यांनी दिली़ युती झाली तर सोबत घेऊ, नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू. पण मनपावर भाजपची सत्ता आणण्यासाठी अहोरात्र काम करू, असेही खा़ शरद बनसोडे यांनी सांगितले़

Web Title: Solapur Municipal Election: BJP wants a strong show in the candidate ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.