शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका परिवहनचे उत्पन्न १० कोटींनी कमी, मनपाच्या अंदाजपत्रकातही करण्यात आली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:22 IST

मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमनपाच्या अंदाजपत्रकासारखी परिवहनच्या अंदाजपत्रकाची स्थिती झालीसन २०१७-१८ साठी परिवहनचे ८३ कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होतेचेसीक्रॅक समस्यामुळे मोठ्या बस धक्क्याला लागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे. मनपाच्या अंदाजपत्रकासारखी परिवहनच्या अंदाजपत्रकाची स्थिती झाली आहे. सन २०१७-१८ साठी परिवहनचे ८३ कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते. यात ९० बस मार्गावर धावणार हे गृहीत धरून उत्पन्न व खर्चाची आकडेमोड करण्यात आली होती. पण चेसीक्रॅक समस्यामुळे मोठ्या बस धक्क्याला लागल्या. त्यामुळे मार्गावर फक्त ३७ बस धावू लागल्या. यामुळे उत्पन्नात बरीच तूट आली. या अंदाजपत्रकात बसच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न १६ कोटी गृहीत धरण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जानेवारीच्या मध्यापर्यंत बस व्यवहारातून केवळ ६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १0 कोटींनी उत्पन्नात तूट आलेली आहे. परिवहन व्यवस्थापकांचा पदभार सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्याकडे गेल्यावर जुन्या बस दुरुस्तीतून सध्या ६० बस मार्गावर काढण्यात यश आले आहे. चालू वर्षी उत्पन्न कमी व तोटा वाढत गेल्याने वेतनाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. त्यामुळे कर्मचाºयांची मानसिकता बिघडत गेली. आता दुरुस्तीनंतर जादा बस ताफ्यात आल्या तरी चालकांअभावी बस डेपोत थांबून आहेत. -------------------अंदाजपत्रकात करणार कपातसन २०१८-१९ चे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. या वेळेस ७५ बस मार्गावर धावणार, असे गृहीत धरून उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. गतवर्षी एका बसचे दरदिवशीचे उत्पन्न ७ हजार रुपये गृहीत धरण्यात आले होते, पण प्रत्यक्षात उत्पन्न ५ हजार आले. पण आताच्या अंदाजपत्रकात ही सद्यस्थिती पाहता हे उत्पन्न ६ हजार गृहीत धरण्यात आले आहे. तोटा कमी करण्यासाठी खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाचा आकडा बराच खाली येणार आहे. ------------------अशी मिळते मदत- परिवहनला मनपाच्या अंदाजपत्रकात ५ कोटी अनुदानाची तरतूद केली गेली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी देण्यात आले आहेत. तसेच सेवानिवृत्तांसाठी ५ कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत ४ कोटी ८० लाख वितरित झाले आहेत. महिला बालकल्याण विभागाकडून शालेय मुलींसाठी मोफत बस प्रवास अनुदानापोटी १ कोटी ४० लाख अनुदान मिळाले आहे. पोलीस अनुदानापोटी आलेले १ कोटी ८७ लाख अनुदान तत्कालीन आयुक्तांनी परत पाठविले आहे. आता ही रक्कम दोन कोटींवर गेली आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांसाठी मोफत बसप्रवासापोटी शासनाकडून १७०० जणांसाठी प्रत्येकी ३६०० प्रमाणे अनुदान दिले जाते. आता दिव्यांगांनाही नाक्याच्याबाहेरही ही सवलत देण्यासाठी प्रत्येकी ७२०० रुपये अनुदानाची मागणी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका