शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका; ‘परिवहन’ भाजपकडे, सहा महिन्यांनी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:00 IST

सोलापूर :  लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनपाची परिवहन समिती यंदा भाजपाकडेच राहणार ...

ठळक मुद्देशिक्कामोर्तब, पालकमंत्री-शिवसेना पदाधिकाºयांची बैठकनेत्यांना अमावस्येची भीती, मनोमिलन मेळावा घेणार !लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब

सोलापूर :  लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनपाची परिवहन समिती यंदा भाजपाकडेच राहणार आहे. सहा महिन्यांनी होणाºया महापौर-उपमहापौर निवडीवेळी उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले. यानंतर पुढील वर्षी एक वर्षासाठी स्थायी समिती आणि परिवहन समितीत सेनेला समान वाटा मिळणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर महापालिकेतही युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्यात प्राथमिक बैठक झाली. शिवसेनेला स्थायी समिती आणि उपमहापौरपद देण्यात यावे, अशी हंचाटे यांनी मागणी केली. या चर्चेचा वृत्तांत दोन्ही देशमुखांच्या कानावर घालून निर्णय कळवू, असे या बैठकीत सांगण्यात आले होते. 

 पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, राजकुमार हंचाटे उपस्थित होते. यंदा परिवहन समिती भाजपाकडे राहावी. सहा महिन्यांनी पुन्हा पदाधिकारी निवडी होतील. त्यावेळी  सेनेला उपमहापौरपद देऊ. सोबत महिला बालकल्याण समिती आणि शिक्षण समिती देऊ, असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी दिले. या समितीचा कालावधी संपल्यानंतर एक वर्षासाठी स्थायी आणि परिवहन समिती सेनेला देण्याचे आश्वासन देण्यात आले. या वाटाघाटींचा वृत्तांत प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे संपर्कमंत्री रामदास कदम यांच्यातही चर्चा झाली आहे. 

नेत्यांना अमावस्येची भीती, मनोमिलन मेळावा घेणार !- पालकमंत्र्यांच्या कार्यालयात युतीवर शिक्कामोर्तब झाले. पण बुधवारी अमावस्या असल्याने गुरुवारी निर्णय जाहीर करण्याचा निर्णय भाजपा व सेनेच्या नेत्यांनी घेतला. दोन्ही पक्षाच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जावा यासाठी परिवहन समिती सभापतीची निवड झाल्यानंतर मनोमिलन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. 

आमच्या प्रतिनिधींनी बुधवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. एकत्र काम करायचे ठरले आहे.  तीन वर्षात एक-एक कॅबिनेट समिती शिवसेनेला मिळावी, अशी आमची मागणी आहे. परिवहन समितीबाबत अद्याप निर्णय झाला नाही. कारण विरोधकांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. चमत्कारही घडू शकतो. गुरुवारी पुन्हा बैठक होईल.                                   - महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना