शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:17 IST

स्पर्धेतही मिळविला फायदा : गत नुकसानीमुळे अद्यापही संघ ७ कोटी तोट्यात

ठळक मुद्देदूध उत्पादक संघाचा २०१७-१८ चे ताळेबंद तयारमागील आर्थिक वर्षात १४ लाख २२ हजार ३७४ रुपये नफाकाटकसरीच्या कारभारातून बरीच बचत

सोलापूर : शासनाचे दूध दराबाबतचे धरसोड वृत्तीचे धोरण तसेच खासगी संघाशी स्पर्धा करताना होणारी दमछाक अशा अवस्थेतही सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मागील आर्थिक वर्षात १४ लाख २२ हजार ३७४ रुपये नफा झाला असला तरी मागील वर्षी (२०१५-१६) चे नुकसान भरुन संघ ६ कोटी ९८ लाख २२६ रुपये तोट्यात आहे. मात्र काटकसरीच्या कारभारातून बरीच बचत केल्याचे नफा-तोटा पत्रकावरुन दिसून येत आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा २०१७-१८ चे ताळेबंद तयार झाला असून शुक्रवारी दिनांक १७ आॅगस्ट रोजी मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.  मागील दोन-तीन वर्षांत राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे दूध उत्पादनाबाबतचे धोरण अक्षरश: शेतकरी व सहकारी दूध उत्पादक संघाचे मरण ठरत आहे. पशुसंवर्धन खात्याचे मंत्री व सचिव केवळ आदेश काढून मोकळे होत असून त्याची अंमलबजावणी होत नसताना खासगी संघापुढे हतबल होताना दिसत आहेत. 

दूध दर वाढीबाबतचे शासनाचे आदेश केवळ सहकारी संघासाठी बंधनकारक असून खासगी संघ मात्र हे आदेश नाकारत आहेत. या स्थितीमुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. खासगी संघांनी मागील वर्षभरात दूध दर कमी करण्याचे आठ वेळा दरपत्रक काढले आहे. सहकारी संघांना मात्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे(किमान ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) दूध दर द्यावा लागतो. 

यामुळे सोलापूरसह राज्यातील सहकारी संघ अडचणीत आले आहेत. अशा स्थितीतही सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला काटकसरीच्या कारभारामुळे १४ लाख २२ हजार ३७४ रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी संघाला ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपयांचा तोटा झाला होता. मागील वर्षीचा तोट्याचा मोठा खड्डा भरणे शक्य नसले तरी यावर्षीचा नफा मागील वर्षीच्या तोट्यात जमा झाला आहे.

रुपये ५१ लाख वाचलेसोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला मार्च २०१७  मध्ये ४३ कोटी ४९ लाख ७७ हजार ४४१ रुपये कर्ज होते. काटकसर व सर्वच बाबीवरील खर्च कमी केल्याने संघाची कोणतीही मालमत्ता विक्री न करता हे कर्ज मार्च २०१८ मध्ये  २८ कोटी ९३ लाख ६२ हजार ५२८ रुपये इतके राहिले आहे. अधिक व्याज असलेले कर्ज भरुन कमी व्याजदराने एच.डी.एफ.सी. बँकेचे कर्ज संघाने काढले आहे.  व्याज कमी दराने द्यावे लागल्याने वर्षभरात दूध पंढरीचे ५१ लाख ६ हजार ६१४ रुपये वाचले असल्याचे सांगण्यात आले. 

१६-१७ मध्ये कर्मचाºयांनी राजीनामे दिल्याने संघावर  मोठा आर्थिक भार पडला होता. तो यावर्षी कमी झाला आहे. बँकेचे कर्ज व व्याजही कमी द्यावे लागल्याचाही संघाला फायदा झाला. जुलैअखेर दूध पंढरीवर अवघे २२ कोटी कर्ज आहे.- आ. प्रशांत परिचारक,चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा