शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Solapur Market; १९३८ सालच्या दुर्मिळ कारला आली ११ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:10 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : हो, सोलापूर बदलतंय अन् सोलापूरकरही... हौसेला मोल नसतं ते अगदी खरंच आहे. इंग्लंडमधील आॅस्टिन कंपनीची ...

ठळक मुद्देसध्या अस्तर मारण्याचे काम पूर्ण झाले असून, काम पूर्ण झाल्यावर लाल रंगाची ही दुर्मिळ कार सोलापूरकरांच्या दर्शनास येणार सोलापुरात परदेशी बनावटीचे कार रिपेअर करणारे प्रशिक्षिक मेकॅनिकही आहेत

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : हो, सोलापूर बदलतंय अन् सोलापूरकरही... हौसेला मोल नसतं ते अगदी खरंच आहे. इंग्लंडमधील आॅस्टिन कंपनीची जी कार १९३८ मध्ये केवळ १२ हजार रुपयांना मिळायची, ती जुनी कार एक हौशी सोलापूरकर बंगळुरूमधून मिळवली अन् लागणारे स्पेअर पार्ट इंग्लंडहून मागवून ती तयार करवून घेत आहे. केवळ स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी हीच कार ११ लाख आणि त्याहूनही अधिक रक्कम देण्यासाठी सोलापुरातील हौशी मंडळी पुढे सरसावली आहेत. जिथे ही कार बनवली जात आहे, त्या वर्कशॉपमध्ये दुसरी एक अ‍ॅम्बॅसिडर आकाराची इंग्लंडमेड मॉरिस मायनर कंपनीची नजरेत भरणारी अन् त्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह न आवरणारी हिरव्या रंगाची कारही सध्या चालू स्थितीत आहे. 

कष्टकºयांचं सोलापूर म्हणजे गिरणगाव समजलं जायचं. इथे काहीच नाही, असा कधी काळी सूरही ऐकावयास मिळत होता. आता सोलापूरची जेणेकरून सोलापूरकरांची मानसिकता बदलत चालली आहे. बदलत्या सोलापुरात सोलापूरकरही बदलत चालले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत चाललेल्या कामांमुळे सोलापूरचा लूक बदलताना दिसतोय. हा बदल सोलापूरकरांना जाणवत नसला तरी कामानिमित्त सोलापुरात आलेल्या पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथील मंडळींना नक्कीच जाणवत आहे. काही मंडळींनी इथल्या नातेवाईकांसमोर, मित्रांसमोर बोलूनही दाखवले. बदलत्या या सोलापुरात हौशी मंडळींचीही कमतरता नाही. अशाच एका हौशी व्यापाºयाने इंग्लंडमधून जुनी कार मागवली. कारला लागणारे स्पेअर पार्टही त्यांनी आणले. 

आॅटोमोबाईलमध्ये डिप्लोमा केलेले इलियास मुमताजअहमद शेख यांचा जुन्या कार विक्रीचा व्यवसाय आहे. कारमधील खडान्खडा माहिती असताना त्याचा उपयोग त्यांनी आपल्या जुन्या कार विक्रीच्या व्यवसायाला करून घेत आहे. एकदा ते आपले सहकारी शब्बीर सय्यद यांना घेऊन इंदौर येथे गेले. तेथे एका ठिकाणी त्यांना इंग्लंडमधील येथील आॅस्टिन कंपनीची जुनी कार पाहावयास मिळाली. १९३८ सालातील ही कार कोण घेईल का? मात्र हौसेला मोल नसते, त्यानुसार त्यांनी ती गाडी विकत घेतली अन् ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी ती आपल्या शोरूमवजा वर्कशॉपमध्ये आणली. आज प्रशिक्षित मेकॅनिककडून ती कार पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम या वर्कशॉपमध्ये सुरू आहे. 

सध्या अस्तर मारण्याचे काम पूर्ण झाले असून, काम पूर्ण झाल्यावर लाल रंगाची ही दुर्मिळ कार सोलापूरकरांच्या दर्शनास येणार आहे. 

हॉर्नही जुन्या काळातील पितळीचाच!- आजकाल दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना असलेले हॉर्न आधुनिक पद्धतीचे आहेत. मात्र या आॅस्टिन कंपनीच्या गाडीचा हॉर्न मात्र ब्रिटिशकालीन पितळीचाच आहे. तोंडाने जरी फुंकर मारली तर १० फुटांपर्यंत त्याचा आवाज जातो, असे नामवंत कार मेकॅनिक शब्बीर सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कारची चारही चाके टू-व्हीलरसारखी !- सध्या भारतात रस्त्यावर धावणाºया कारच्या चाकांपेक्षा या आॅस्टिन कारची चाके मात्र टू-व्हीलरप्रमाणे पाहावयास मिळतात. टू-व्हीलर चाकांमुळे कारची गती अधिक असते अन् पेट्रोलचीही चांगलीच बचत होते. चौघे आरामात बसतील, अशी आतील आसनव्यवस्था असून, सनरूफचा (छताचा काही भाग उघडा) प्रकारही या कारमध्ये पाहावयास मिळतो.

चार प्रशिक्षित मेकॅनिक लागले कामाला !- सोलापुरात परदेशी बनावटीच्या कार दुरुस्ती करणारे मेकॅनिक सोलापुरात आहेत. शब्बीर सय्यद, रेहान इनामदार, सर्फराज काझी आणि बाबुराव सोनवणे हे चार प्रशिक्षित मेकॅनिक १९३८ मधील आॅस्टिन-७ ही कार बनवत आहेत. किरकोळ स्पेअरपार्टसाठी त्यांना हैदराबाद, कोलकत्ता आणि वेळप्रसंगी इंग्लंडमध्ये जावे लागत आहे. पुढील वर्षी दिल्लीत ब्रिटिशकालिन कारचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात ही कार नंबर वनचा किताब पटकावेल, अशी अपेक्षा चौघांनी व्यक्त केली. 

सोलापुरात काही नाही, हे विचारा. परदेशी बनावटीचे कार रिपेअर करणारे प्रशिक्षिक मेकॅनिकही आहेत. आस्टिन-७ ही कार जेव्हा रस्त्यावर धावेल, तेव्हा ती कार सोलापूरकरांच्या पसंतीस उतरेल. काही जण बंगल्यात, हॉटेलसमोर शो-पीस म्हणून ही कार रहावी, असा विचारही करीत आहेत. जेव्हा दिल्लीतील कार प्रदर्शनात ही कार नंबर वन येईल, तेव्हा बदलत्या सोलापूरच्या प्रचितीचा दाखला मिळाल्याशिवाय राहणार नाही. -इलियास शेख, जुने कार विक्रेते.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारcarकारAutomobileवाहन