शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: जिल्ह्याबाहेर रक्त पुरवठा करताना सिव्हिल सर्जनकडून एनओसी बंधनकारक

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: August 27, 2023 16:15 IST

Solapur: सोलापूर जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना ब्लड बँकांना आता जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्याबाहेर अधिक रक्तपुरवठा होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवू लागली.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर - जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना ब्लड बँकांना आता जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्याबाहेर अधिक रक्तपुरवठा होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे ही टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेने सर्व ब्लड बँकांना नव्या नियमाचे सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन नियमामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त टंचाई कमी होत असल्याची माहिती जिल्हा औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सचिन कांबळे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात एकूण १८ खाजगी तसेच एक शासकीय रक्तपेढी आहे. रक्त संकलन परिषद ही रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवणारी शासकीय संस्था आहे. जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकाची एनओसी लागत नव्हती. शासकीय रुग्णालयांनी महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेला पत्र लिहून रक्तटंचाईची माहिती दिली. शासकीय रुग्णालयात मुबलक रक्तपुरवठा केल्यानंतरच संबंधित रक्तपेढ्यांना जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रक्त संकलन परिषदेने शासनाकडे केली. त्यानंतर नवीन नियम लागू केले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीSolapurसोलापूर