शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर लोकसभा मतदारसंघ; चार उमेदवार विधी शाखेचे; दोन पदव्युत्तर शिकलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:26 IST

लोकमत विशेष - राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’ ; कोणत्या मेरिटवर होते मतदान, मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ?

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांसाठी सोलापूर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का पन्नास टक्के१३ उमेदवारांपैकी अर्ध्या उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर सहाजण पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

राजकुमार सारोळे 

सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी सोलापूर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का पन्नास टक्के असल्याचे चित्र आहे. १३ उमेदवारांपैकी अर्ध्या उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर सहाजण पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. प्रमुख राजकीय पक्षांकडून उभे असलेले उमेदवार उच्चशिक्षित आहेत; मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये पदवीधरांचे प्रमाण कमी आहे. 

निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ५0 टक्के उमेदवार हे पदवी किंवा  पदव्युत्तर म्हणजे एलएलबी किंवा पीएच.डी. धारण केलेले उमेदवार आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार कसा असावा, याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 

उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे ३ उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. इतर ३ उमेदवारांपैकी एकजण बारावी उत्तीर्ण आहे तर उर्वरित दोघे उमेदवार दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण आहेत. राजकीय पक्षांतील ८० टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत. 

विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधर एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ३0 टक्के उमेदवार हे विधी पदवीधर तर १५  टक्के उमेदवार हे कला विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षितांचे प्रमाण पन्नास टक्के आहे.

मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?

उमेदवार उच्चशिक्षित असणे गरजेचे लोकसभेचा उमेदवार उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या योजना व संसदेत बोलणाºया व्यक्तींना आम्ही प्राधान्य देऊ. उमेदवाराच्या शिक्षणाचा आम्ही जरूर विचार करणारच.      — प्रांजल कोळी, सोलापूर

उमेदवारांचा बायोडाटा पाहून पुढचे ठरवणारउमेदवार उच्चशिक्षित आहे की नाही हे आम्हाला त्यांचा बायोडाटा पाहिल्यावरच कळणार आहे. त्यामुळे आम्ही त्या उमेदवाराचा बायोडाटा पाहून उच्चशिक्षित आहे की नाही याची खातरजमा जरूर करणार.      —मुनाफ शेख, सोलापूर

उमेदवाराचा अभ्यास किती आहे हे महत्त्वाचेनुसता उमेदवार उच्चशिक्षित असून उपयोगाचे नाही. त्याचा अभ्यास किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. संसदेत तोंड न उघडणारा उमेदवार काय कामाचा. त्याच्या वक्तृत्वशैलीवरून आम्ही पुढचे काय ते ठरवू.     —नेहा पुला, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरEducationशिक्षण