शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

सोलापूर इनिशिएटिव्ह; कचरा हटव बयेऽऽ कचरा हटव....आपल्या परिसराचा थेट फोटो पाठव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:11 IST

सोलापूर ‘लोकमत’चा पुढाकार: सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी सोलापूरच्या ‘स्त्रीशक्ती’ला आवाहन

ठळक मुद्देसोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.महिलांनी आपल्या परिसरातील कचºयाची माहिती 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावी.

सोलापूर: आपल्या शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवायचं असेल तर अगोदर ‘स्वच्छ सोलापूर’ ही मूलभूत गरज असल्याचं सोलापूरकरांच्या लक्षात आलंय. महापालिकेनं शेकडो घंटागाड्या घरोघरी फिरवण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही बºयाच ठिकाणी रस्त्यावर कचरा साठलेला दिसतोय. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’नं आजपासून एका वेगळ्या चळवळीचा शुभारंभ केलाय.. अर्थात ‘स्मार्ट सिटी-स्मार्ट सखी’.

ज्यात आपापल्या परिसरातील सार्वजनिक कचरा कायमचा दूर करण्यासाठी पुढाकार घेतील सोलापूरच्या सुज्ञ भगिनी. गेल्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. चारही बाजूने वाढलेल्या या शहरातील कचºयाची मूलभूत समस्या दूर करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, वर्षांनुवर्षाची सवय लागलेल्या मंडळींकडून रस्त्यावर कचरा टाकणे काही बंद होत नसल्याचे दिसत आहे. ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी सर्वप्रथम ‘स्मार्ट सोलापूरकर’ बनणं गरजेचं आहे. हे ओळखूनंच स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ने स्वच्छतेची ही मोहीम हाती घेतली आहे. यातून आपले शहर जास्तीत जास्त स्वच्छ राहण्यावर भर दिला जाईल.

स्मार्ट सोलापूरकर हे करतील...

  • ज्या-ज्या ठिकाणी अजूनही रोज कचरा रस्त्यावर पडतो त्या ठिकाणी परिसरातील उत्साही महिला स्वत:हून पुढाकार घेतील.
  • या महिला सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांचे फोटो काढून ‘लोकमत’कडे पाठवतील. 
  • हे फोटो ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा संबंधितांवर तत्काळ कारवाई करेल. 
  • यानंतर संबंधित ठिकाणी या महिलांचा चमू जाऊन तेथील नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल प्रबोधन करेल.
  • प्रत्येक घरातील कचरा घंटागाड्यांमध्येच टाकण्याची सवय लावली जाईल. 
  • सातत्यानं फॉलोअप घेऊन ते ठिकाण कायमस्वरूपी स्वच्छ ठेवलं जाईल. 

तुमच्या परिसरात कचरा साठलाय? काढा फोटो अन् पाठवा मेसेज!- सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाईल, त्या मोहिमेची सचित्र माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.. तेव्हा महिलांनी आपल्या परिसरातील कचºयाची माहिती 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावी. चला तर मग.. उचला मोबाईल, काढा फोटो अन् पाठवा मेसेज.

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका