सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. महापुरामुळे सहा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
वडशिंगेजवळ वाहून जाणाऱ्या कारमधून पाच जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. खडक तलावात आठ शेळ्या वाहून गेल्या, वाहतूक बंद झाल्याने अनेकांचा गावांचा संपर्क तुटला आहे. बार्शी तालुक्यातील तात्पुरत्या पुलाचा भराव वाहून गेल्याने महूद-सांगोला वाहतूक बंद झाला आहे. घुमेरा ओढ्याला पूर आल्याने अकलूज-सांगोला वाहतूक बंद झाली आहे. सीना-नदीला पूर आल्याने जेऊन कोंढेज, लव्हे, करमाळा, अर्जुननगर गावांचा संपर्क तुटला आहे. बोरी उमरगे, शिरसी, निमगाव, पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे. सीना नदीत सोडले दोन लाख क्युसेक विसर्ग झाल्याने मोहोळमधील बोपले, अनगर, मलिकपेठ, आष्टे, भोयरे, डिकसळ, देगाव पूल पाण्याखाली गेली आहेत. हिना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली गेला असून बार्शीतील हिगणी, जवळगावच्या धरणाच्या सांडव्यातून मोठा विसर्ग सुरू आहे.
भोगावती नदीला पूर आल्याने वाहून गेलेल्या गोठ्यातील ५० जनावरे वाचवली आहेत. मोहोळमधील जाधव वस्ती, वाळूज बसस्थानकाला पाण्याचा वेढा असून चांदणी धरणाचे सर्व २८ दरवाजे उघडले आहेत. नदी काठच्या लोकांचे शाळा, समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आले असून अनगर, नरखेड, बाेपले-अनगर, आष्टे-मोहोळ, नरखेड-वडाळा, नरखेड-मोहोळ, नरखेड-वैराग, मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कुर्डुवाडीतील नागरी वस्तीत पाणी शिरले असून यावली ते वैरागचा संपर्क तुटला. वैराग-धाराशिव रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेला आहे. उत्तर तालुक्यातील २५० कुटुंबं स्थलांतरित झाली आहेत. अक्कलकोटमधील बॅगेहळ्ळी-हंजगीचा संपर्क तुटलामाशाळे वस्तीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहेत.