शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विधानसभा निवडणूक ; पहिल्या फेरीचा निकाल येणार सकाळी साडेआठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 07:27 IST

Solapur Vidhan Sabha Election Results 2019: मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरूवात : दुपारी बारा वाजेपर्यंत समजणार कौल कोणाला

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीची जय्यत तयारीसकाळी साडेआठ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल अशी यंत्रणा कार्यरतप्रत्येक टेबलला तीन कर्मचारी याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २५0 कर्मचाºयांची नियुक्ती

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली असून, आज गुरूवार, दिनांक २४ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल अशी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता त्या-त्या केंद्रावर सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर १४ टेबल करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २५0 कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीच्या टेबलानंतर ही माहिती संकलित करण्यासाठी अतिरिक्त ४ टेबल प्रत्येक केंद्रावर राहणार आहेत. याशिवाय मतदान केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर सीसी कॅमेºयाची नजर असणार आहे.

सकाळी स्ट्राँगरूममधून ईव्हीएम काढून मतमोजणीस सुरूवात करेपर्यंत अर्धा तासाचा कालावधी जाणार आहे. पहिल्या दोन फेºयांना तासभर लागणार आहे. त्यानंतरच्या फेºया १५ ते ३0 मिनिटांत पूर्ण होतील, असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार २0 ते २५ फेºयांत मतमोजणी पूर्ण होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत कल स्पष्ट होईल आणि एक ते दोन वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.  मतदान केंद्रात मतमोजणीच्या कर्मचाºयांना सकाळी सहा वाजेपासून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर सात वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या १00 मीटर परिसरात कोणालाही सोडले जाणार नाही.

याशिवाय वाहन पार्किंग करता येणार नाही. सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नूमवि शाळेत तर शहर उत्तर विधानसभेची मतमोजणी नॉर्थकोट प्रशालेत होणार आहे. त्यामुळे खिंडरोड व ज्ञानप्रबोधिनी ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. रंगभवन ते डफरीन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पच्या गोदामात होणार आहे. 

उत्तर, मध्यचा लवकर निकाल- सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण सोलापूरमध्ये मतदान कमी झाले आहे. असे असले तरी मतमोजणीसाठी सर्व ईव्हीएम घ्यावे लागणार असल्याने कालावधी तितकाच लागणार आहे. पण फेºया कमी असल्याने शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूरचे निकाल लवकर बाहेर येतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे, हेमंत निकम आणि ज्योती पाटील यांनी दिली.

निकाल ‘लोकमत’ फेसबुक पेजवर- जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य उद्या(गुरुवारी) खुलणार आहे. कोण बाजी मारणार याची ताजी माहिती व मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची आकडेवारी ‘लोकमत’ फेसबुक पेजवर शेअर केली जाणार आहे. नागरिकांनी जिल्ह्यातील निवडणुकीचा ताजा निकाल पाहण्यासाठी ‘लोकमत’ फेसबुक पेजला भेट द्यावी.

पोस्टल मतांची मोजणी- पहिल्यांदा निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व्हिस व्होटरच्या पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. सहायक निवडणूक अधिकाºयांच्या निगराणीखाली यासाठी चार टेबल ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर लगेच स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मोजणीसाठी बाहेर काढण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्याची घोषणा करतील. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या अपेक्षित असलेल्या फेºया पुढीलप्रमाणे आहेत. करमाळा, माळशिरस व माढा: २४, मोहोळ व बार्शी: २३, शहर उत्तर: २0, शहर मध्य: २१, अक्कलकोट: २५, दक्षिण सोलापूर: २२, पंढरपूर: २३, सांगोला: २१.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदानsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्यsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तरpandharpur-acपंढरपूरbarshi-acबार्शी