सोलापूर इलेक्शन : माळशिरस पं़ स़ मध्ये सत्ता परिवर्तन
By Admin | Updated: February 24, 2017 18:31 IST2017-02-24T18:31:23+5:302017-02-24T18:31:23+5:30
सोलापूर इलेक्शन : माळशिरस पं़ स़ मध्ये सत्ता परिवर्तन

सोलापूर इलेक्शन : माळशिरस पं़ स़ मध्ये सत्ता परिवर्तन
सोलापूर इलेक्शन : माळशिरस पं़ स़ मध्ये सत्ता परिवर्तन
एल. डी. वाघमोडे - आॅनलाईन लोकमत माळशिरस
तालुक्यात जि़ प़ व पं़ स़ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत जि़ प़ च्या ११ पैकी ८ तर पं़ स़ च्या २२ पैकी १४ जागा जिंकून सत्तांतर घडविले़ भाजपाने जि़ प़ च्या ३ तर पं़ स़ च्या ७ आणि शिवसेनेने १ जागा जिंकली आहे़ या निवडणुकीत काँग्रेस, शेतकरी संघटना, रासप या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही़ या पक्षाचा अक्षरश: धुव्वा उडाला़ शिवाय या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले़
उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर यांना संग्रामनगर जि़ प़ गटातून पराभवाला सामोरे जावे लागले तर पं़ स़ च्या विद्यमान उपसभापती डॉ़ शुभांगी देशमुख यांचा मांडवे गटातून पराभव झाला़ विद्यमान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी पं. स. सदस्या श्रीलेखा पाटील यांचा दहिगाव जि़ प़ गटातून पराभव झाला तर मधुकर वाघमोडे यांच्या पत्नी शोभा वाघमोडे यांचा फोंडशिरस गणातून पराभव झाला़ अकलूज जि.प. गटातून माजी जि़ प़ सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचा तर त्यांची सून उर्वशीराजे मोहिते-पाटील यांचा यशवंतनगर पं़ स़ गणातून पराभव झाला़ शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गोरड यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले़ भीमराव फुले काँग्रेसमधून उभे होते, त्यांचाही पराभव झाला़
तसेच विद्यमान जि. प़ सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील या अकलूज जि़ प़ गटातून विजयी झाल्या़ विद्यमान जि. प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे संग्रामनगर पं़ स़ गणातून निवडून आले तर त्यांच्या पत्नी वैष्णवीदेवी मोहिते-पाटील याही विजयी झाल्या़ त्यामुळे हे दोघे पती-पत्नी या निवडणुकीत विजयी झाले आहेत़ विद्यमान पं़ स़ सदस्य राधाबाई लांडगे या पराभूत झाल्या़ या निवडणुकीत काँग्रेसचे आ़ रामहरी रुपनवर व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील हे सक्रिय असतानासुद्धा काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही़ काँग्रेसने जि़ प़ साठी ४ व पंचायत समितीसाठी ५ जागा लढविल्या होत्या; मात्र काँग्रेसचे पानिपत झाले़ शेतकरी संघटनेचीही तीच अवस्था झाली़ या निवडणुकीत स्वरुपाराणी मोहिते-पाटील या सर्वाधिक ६ हजार ५३८ मताने तर पं़ स़ मध्ये शोभा साठे या ९० मतांनी विजयी झाल्या़ जांबुड गणातून नानासाहेब नाईकनवरे हे ५ हजार २९ मताधिक्क्याने विजयी झाले़