शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: कुर्डूवाडी- पंढरपूर रस्त्यावर कुर्डूजवळ टँकर अन् टेम्पोच्या धडकेत चालक ठार

By दिपक दुपारगुडे | Updated: March 23, 2024 20:17 IST

Solapur Accident News: टेम्पो आणि दूध वाहून नेणारा टँकर ही दोन वाहने समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला. टेम्पोचालकावर सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

- दीपक दुपारगुडे सोलापूर  : टेम्पो आणि दूध वाहून नेणारा टँकर ही दोन वाहने समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला. टेम्पोचालकावर सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्यावर कुर्डू हद्दीत झाला. या अपघातात वाही सुरेश (वय ४०, रा. आंध्र प्रदेश) हा टँकर चालक मरण पावला तर टेम्पो चालक रोहितकुमार पटेल (वय २५, रा. उत्तर प्रदेश) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर (ए. पी. ३९ / व्ही.ए. ५११७) हा कुर्डूवाडीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला होता. यावेळी समोरून वेगात येणाऱ्या एका कारला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने टँकर राँग साईडने आणला. याचवेळी पंढरपूरहून कुर्डूवाडीच्या दिशेने समोरून येणाऱ्या टेम्पो (एम.एच. ०४ / के. यू. ७६७८) ची समोरासमोर जोराची धडक झाली.

या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांच्या बाजूकडील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. टँकर चालक हा गंभीर जखमी झाला तर आयशर कंपनीचा टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान, दोघा जखमींना तातडीने एका ॲम्ब्युलन्सद्वारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करून त्यांना सिव्हिल हाॅस्पिटलला पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान टँकर चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे अपघात पथकातील प्रमुख हवालदार शिवाजी कांबळे, हवालदार चंद्रकांत रोडे अपघातस्थळी तत्काळ दाखल झाले. यावेळी अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर