शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर डॉक्टर आत्महत्या प्रकरण: मनीषा मानेच्या घराची झडती घेतली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:09 IST

डिसेंबर २०२४ पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषाने डॉक्टरांना चिठ्ठी पाठविली होती. घटनेपूर्वी वळसंगकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती. त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली. ती मिळविण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली; पण चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिस सूत्राने स्पष्ट केले.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे अनाकलनीय गूढ निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला २३ एप्रिलपर्यंत आणि त्यानंतर २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत तपासात मनीषाने कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केले नाही. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या जबानी घेतल्या. डिसेंबर २०२४ पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयास्पद नाही आढळलेमनीषाला गुरुवारी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र, ई-मेलचे प्रिंट आऊट जप्त केले. शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले. मात्र, मनीषाने जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी अन् संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे घर अन् हॉस्पिटल गाठले होते; पण काही हाती लागले नाही. उपाशी राहू नको!मनीषाची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला आज कोर्टात आणले. कोर्टरूममधील प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयातून पुन्हा कोठडीत नेण्यासाठी पोलिसांनी मनीषा व्हॅनमध्ये बसविले तेव्हा पोलिस गाडीत बसताना तिची दोन मुले, मनीषाची आई संजूबाई अन्य नातलगांनी तिच्याशी काही मिनिटे संवाद साधला. मनीषाची आईनं 'तिला उपाशी राहू नको, जेवण व्यवस्थित कर' असा सल्ला दिला. यावर मनीषानंही 'माझी काही काळजी करू नका' असे उत्तर देत सर्वांना धीर दिला. 

टॅग्स :Solapurसोलापूर