शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

शासनाच्या योजना परिपूर्ण राबविण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:40 IST

सोलापूर दि २१ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर असताना तीन महिन्यांत तो राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे

ठळक मुद्दे१३,०२९ घरकुलांना प्रशासकीय मान्यता पूर्णडिसेंबरअखेर १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर असताना तीन महिन्यांत तो राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. घरकुलांच्या बाबतीत ९९ टक्के काम प्रगतिपथावर असून, डिसेंबरअखेर १०० टक्के काम पूर्ण होईल, अशी ग्वाही जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये एकूण १३,०२९ घरकुलांना प्रशासकीय मान्यता पूर्ण केली आहे. आॅनलाईन आवास सॉफ्टवेअरमध्ये हे कामकाज १०० टक्के पूर्ण झाले आहे. १३,०२९ मंजूर घरकुलांपैकी आजअखेर १२,८८७ घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचे वाटप करण्यात आले आहे. ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, दुसरा ७३७७ रुपयांचा हप्ता लाभार्र्थींना वाटप करण्यात आला आहे. ५७ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०१७ पासून ते आजअखेर एकूण मंजूर घरकुलांपैकी १२७९ घरकुले बांधून पूर्ण केली आहेत. उर्वरित ११,७५० घरकुलांचे काम डिसेंबरअखेर १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आखल्याचे सीईओ डोंगरे यांनी सांगितले.इंदिरा आवास योजनेंतर्गत २००८-०९ ते २०१५-१६ अखेर एकूण ७५७९ अपूर्ण घरकुलांपैकी मे २०१७ ते आजअखेर १७७१ घरकुले पूर्ण केली आहेत. उर्वरित अपूर्ण घरकुले आॅक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्राप्त ५२७१ उद्दिष्टापैकी आजअखेर एकूण १४६४ घरकुलांना आॅनलाईन मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ३८०७ घरकुलांना आॅगस्ट २०१७ अखेर १०० टक्के प्रशासकीय मान्यता देऊन पहिला हप्ता १०० टक्के वाटप करण्यात येत आहे. अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर होता, तो सीईओ डॉ. भारुड रुजू झाल्यानंतर तिसºया क्रमांकावर आल्याचे उपलब्ध माहितीनुसार समोर आले आहे.----------------------------सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद कामकाज करताना तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, कर्मचाºयांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हास्तरावरुन जिल्हा ग्रामीण यंत्रणामधील प्रकल्प संचालक, सहायक प्रकल्प संचालक, उपअभियंता, शाखा अभियंता यांचे परिश्रम मोलाचे आहे. - राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर