शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 11:12 IST

सरकारशी लढणारच;  मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

सोलापूर : कोरोनामुळे सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बंद पुकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. गोरगरीब शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे लोकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंग पाळून साखळी मोर्चा काढणे, गनिमी काव्याने आंदोलने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली. आमची लढाई सरकारशी आहे. न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी सरकारवर दबाव वाढवू, असेही त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, दास शेळके, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, मिलिंद भोसले, विजय पोखरकर, अमोल भोसले, वाय.पी. पवार, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप कोल्हे म्हणाले, मराठा आरक्षणात शासन कुठे कमी पडले याची समिक्षा होणे आवश्यक आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने आरक्षणासाठी आत्महत्या करणे, जीव धोक्यात घालू नये. समाजातील आणखी बळी आपल्याला नको आहेत. आपल्याला ही लढाई नेटाने पुढे न्यायची आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यायची आहे. परंतु, समाजाच्या प्रश्नाची तीव्रता शासनाला लक्षात यावी यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करावे. समाजाचा पुन्हा एकदा मोर्चा काढायचा. फिजीकल डिस्टिन्सिंग पाळून हा मोर्चा काढण्यात यावा. मागील मोर्चावेळी सर्व समाजाने मराठा समाजाला साथ दिली होती. कोरोनाच्या अडचणीच्या काळात बंद केल्यास इतर समाजाचेही नुकसान होणार आहे. मराठा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला मागे सरकणार नाही, मात्र इतरांचे नुकसान होऊ देणार नाही, असेही कोल्हे म्हणाले. उद्या पुन्हा बैठकमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. समाज बांधवांनी या बैठकीला हजर राहावे, असे आवाहन प्रताप चव्हाण आणि तुकाराम मस्के यांनी केले. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न...मराठा समाजातील तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाकडून होत असल्याचा आरोप राम जाधव आणि किरण पवार यांनी केला. आम्ही समाजासाठी आंदोलन करतोय. पण पोलिसांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. याविरुध्द आवाज उठविण्यात येणार असल्याचे जाधव आणि पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा