शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जलयुक्तनंतरमागेल त्याला शेततळे योजनेत सोलापूर जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:00 IST

कृषी विभागाची कामगिरी यशस्वी , जिल्ह्यात ४५०० शेततळी पूर्ण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने यांची माहिती

ठळक मुद्देदुष्काळी असलेला सांगोला तालुका शेततळे बांधण्यात अग्रेसर सोलापूर जिल्ह्याला ८००० शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने दिलेशेतकºयांनी योजनेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद दिला

सोलापूर : जलयुक्त शिवार योजनेत राज्यात अग्रेसर राहिलेल्या सोलापूर जिल्ह्याने मागेल त्याला शेततळे योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात ४५०० शेतकºयांना शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. यातून १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने यांनी दिली.

माने म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजना फेब्रुवारी २०१६ ला सुरु झाली. याअंतर्गत शेततळ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. ०.६० हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थ्यांची निवड करताना दारिद्र्यरेषेखालील किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकºयांना प्राधान्य दिले जाते. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ज्येष्ठतेनुसार प्रथम येणाºयास प्राधान्य दिले जाते.

सोलापूर जिल्ह्याला ८००० शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने दिले. शेतकºयांनी योजनेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद दिला. योजनेंतर्गत दोन वर्षांत २४ हजार १६८ अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ हजार १८४ अर्जांना मंजुरी देण्यात आली. यातील १५ हजार २२८ कामांना मंजुरी आदेश देण्यात आला.

निकषानुसार पडताळणी करून एकूण ८ हजार १२१ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. त्यापैकी ४ हजार ६२४ शेततळे बांधून पूर्ण झाली असून, त्यापैकी ४ हजार ४८५ शेततळ्यांना एकूण १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले, असे माने यांनी सांगितले.

सांगोला तालुका शेततळे बांधण्यात अग्रेसरच्परंपरेने दुष्काळी असलेला सांगोला तालुका शेततळे बांधण्यात अग्रेसर आहे. सांगोला येथे पहिल्या वर्षी ३६५ तर दुसºया वर्षी ४५० अशी एकूण ८१५ शेततळी बांधण्यात आली. खालोखाल पंढरपूर व मंगळवेढा तालुके अनुक्रमे ७५८ आणि ५३८ शेततळ्यांसह दुसºया आणि तिसºया क्रमांकावर आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयJalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्र