शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका फेटाळली; प्रशासक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:10 IST

सोलापूर : संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ ...

ठळक मुद्देमुंबईत निर्णय : बरखास्तीविरोधातील याचिका उच्च न्यायालयात निकालीसंचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने ३० मे  २०१८ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले

सोलापूर : संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईला आव्हान देणाºया याचिका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंद्रजित महंती व सूरज कोतवाल यांनी गुरुवारी निकाली काढल्या.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने ३० मे  २०१८ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या कारवाईला राजन पाटील, शिवानंद पाटील व भारत सुतकर या तीन  संचालकांनी ३० जून रोजी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.ही याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने फेटाळल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील प्रशासक कायम राहणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची  थकबाकी वरचेवर वाढत असल्याने  मार्च २०१८ मध्ये एनपीए ३९ टक्क्यांवर पोहोचला होता. २०१६-१७ या वर्षीच्या आर्थिक ताळेबंदानुसार जिल्हा बँकेची थकबाकी वरचेवर वाढत असल्याने आर्थिक सुधारणा होणे आवश्यक असल्याचा ठपका नाबार्डने तपासणीनंतर ठेवला होता.

बँकेच्या कामकाजाबाबत ३१ मार्च १७ च्या स्थितीवर नाबार्डने गंभीर दोष असल्याचे सांगितले होते.  बँकेविरोधात सहकार कायदा कलम ११० अ अन्वये कारवाई करण्याबाबत ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी सहकार आयुक्तांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने सहकार कायदा कलम ११० अ नुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने २१ मे  २०१८ रोजी सहकार आयुक्त कार्यालयाला कळविले. या अहवालाच्या अनुषंगाने सहकार कायदा कलम ११० अ नुसार बँकेचे संचालक मंडळ ३० मे रोजी बरखास्त करण्यात आले होते.

 या कारवाईला संचालक शिवानंद पाटील, राजन पाटील व भारत सुतकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, नाबार्डने केलेली तपासणी कारवाईचा कालावधी हा मागील संचालक मंडळाच्या कालावधीचा असल्याने याला आम्ही जबाबदार नाही असे शिवानंद पाटील यांनी याचिकेत म्हटले होते. भारत सुतकर यांच्या याचिकेतही याच मुद्याचा समावेश होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने कारवाई करण्याअगोदर संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा मांडला होता.

तशी गरज नसल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने गुरुवारी संपूर्ण याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. वाय.एस. जहागीरदार, अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी, अ‍ॅड. माधव थोरात यांनी काम पाहिले. 

न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे, परंतु प्रशासकांच्या कालावधीत बँकेत आर्थिक सुधारणा झालेल्या दिसत नाहीत. शेतकºयांचे कर्ज वाटप ठप्प आहे. थकबाकीचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. - राजन पाटीलमाजी चेअरमन, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट