शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

सोलापूर जिल्हा बँकेचा कर्ज वाटपाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:28 IST

खरिपासाठी १६१ कोटींचे कर्ज : मागील वर्षापेक्षा ५२ कोटींचे अधिक वाटप 

ठळक मुद्देकर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज  सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाचा धडाका लावला असून, सोमवारपर्यंत २१ हजार ७९५ शेतकºयांना १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये खरीप हंगामासाठी वाटप केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकºयांना कर्ज मिळत नाही, अशी ओरड करुन जिल्ह्यातील शेतकरी थकले होते. बँकेचे प्रशासन व पदाधिकारी पैसे नसल्याचे कारण सांगत होते. एकीकडे थकबाकी वसुली होत नव्हती व दुसरीकडे नव्याने कर्जही मिळत नव्हते. पर्यायाने शेतकरी जिल्हा बँकेऐवजी अन्य बँकांकडून आपली आर्थिक गरज भागवत आहे. ३० मे रोजी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकºयांना कर्ज वाटप करण्यावर भर दिला जात आहे. ९ जुलैपर्यंत जिल्हाभरात १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये पीक कर्ज २१ हजार ७९५ शेतकºयांना वाटप केले आहे. मेअखेरला अवघे ४८ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये कर्ज वाटप झाले होते. 

मागील सव्वा महिन्यात कर्ज वाटपाची आकडेवारी १६१ कोटींवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९४ लाख रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे. शेतकºयांची संख्याही वाढली असून, मेअखेरला ४ हजार ९२९ शेतकºयांना कर्ज वाटले होते. ते सोमवार, दिनांक ९ जुलैपर्यंत २१ हजार ७९५ इतके झाले आहे. महिनाभरात १६ हजार ८६६ शेतकºयांना बँक कर्ज वाटू शकली. 

कर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज 

  • - प्रशासकाच्या सव्वा महिन्याच्या कालावधीत झाले १६ हजार ८६६ शेतकºयांना ११२ कोटी २५ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज वाटप़
  • - खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला २८४ कोटी ७९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १६० कोटी ९८ लाख रुपये म्हणजे ५६.५२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
  • - संपूर्ण कर्जमाफी झालेल्यांपैकी ४ हजार १०० शेतकºयांनी ४५ कोटी ४० लाख, एकरकमी परतफेड योजनेतील ५ हजार १३० शेतकºयांनी ५२ कोटी ३३ लाख, प्रोत्साहनचा फायदा मिळालेल्यांपैकी ३० हजार शेतकºयांनी २८५ कोटी असे एकूण ३९ हजार २३० शेतकºयांनी ३८२ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांची नव्याने कर्ज मागणी केली आहे. 
  •  

कर्जमाफीतील शेतकºयांशिवाय..- एकरकमी परतफेड केलेल्यांपैकी ३ हजार ५८ शेतकºयांना २७ कोटी ७४ लाख, प्रोत्साहनचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ हजार ५२१ शेतकºयांना १०४ कोटी ५० लाख ८७ हजार रुपये असे कर्जमाफीतील १८ हजार ५७९ शेतकºयांना १३२ कोटी २४ लाख ९१ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय ३२१६ शेतकºयांना २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले आहे. एकूणच जिल्ह्याची वसुली म्हणावी तितकी नाही. सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के असली तरी अन्य तालुके मागेच आहेत. वसुलीशिवाय कर्ज वाटप अशक्य आहे. यासाठीच बैठकांतून सूचना दिल्या जात आहेत.-अविनाश देशमुखप्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना