शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँक, सहकार खाते आमने- सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:42 IST

चौकशीवरील संस्थगिती उठविण्याच्या मुद्यावर सहकार खाते व जिल्हा बँकेची नवी स्वतंत्र याचिका

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर पुन्हा संकटाचे ढग बेकायदेशीर कर्जवाटपाची चौकशी व संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर पुन्हा संकटाचे ढग आले असून, कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित करण्यास दिलेली स्थगिती उठविण्यासाठी सहकार खात्याने पुढाकार घेत स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. ८८ कलमान्वये चौकशीला डोणगाव विकास सोसायटीच्या याचिकेवर दिलेल्या स्थगितीवर सुनावणी सुरू असताना जिल्हा मध्यवर्ती बँकही आता वादी झाली आहे.

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत व इतरांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटपाची चौकशी व संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २५ मार्च २०१४ च्या आदेशान्वये तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक बिभीषण लावंड यांनी चौकशी करून संचालक दोषी असल्याचा अहवाल दिला होता.

या अहवालात संचालक मंडळाने पुरेसे तारण न घेता दिलेले ११०४.०१ कोटी इतके कर्ज थकल्याचे अहवालात म्हटले होते. या चौकशीला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी आतापर्यंत उच्च न्यायालयात १४ सुनावण्या झाल्या असून, या सुनावण्या सुरू असतानाच जिल्हा उपनिबंधकांनी न्यायालयात २० मार्च २०१८ रोजी दिवाणी अर्ज दाखल करून स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.

एकीकडे सहकार खात्याने स्थगिती उठविण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही यात उडी घेतली आहे. डोणगाव विकास सोसायटीची याचिका सुरू असताना आम्हालाही यात सहभागी करून घ्या, असा जिल्हा बँकेने दिलेला अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. 

कलम ८८ साठी नेमले तीन अधिकारी

  • - लावंड यांच्या अहवालावर कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी डी. बी. पाटील यांची नियुक्ती केली. पाटील यांच्याकडून चौकशी झाली नसल्याने पुन्हा निबंधक बी. यू. भोसले यांची नियुक्ती केली. भोसले यांच्याकडून पुन्हा सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. मकरे यांची ४ डिसेंबर १५ रोजी नियुक्ती केली.
  • - ८८ अन्वये चौकशी अधिकारी मकरे यांनी ७२(१), ७२(२), ७२(३), ७२(४), ७२(५), ची चौकशी पूर्ण केली. ७२(६) नुसार चौकशी प्रकरण निकालात नेमले होते. 
  • - याच दरम्यान डोणगाव विकास सोसायटीच्या वतीने उच्च न्यायालयात १९६७/२०१७ याचिका दाखल झाली. न्यायालयाने २३ डिसेंबर १६ च्या आदेशान्वये चौकशी अधिकारी कलम ८८ अंतर्गत अहवाल अंतिम करू नयेत, असे आदेश दिल्याने चौकशी आतापर्यंत थांबली आहे. 
  • - या याचिकेवर आतापर्यंत १४ सुनावण्या झाल्या असल्या तरी ८८ अन्वये चौकशीवरील स्थगिती उठली नाही. 
टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकCourtन्यायालयPoliceपोलिस