शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: कोरड्या नाल्यात सापडलं ‘त्या’ प्रौढाचं प्रेत, पोलिसांचा शोध सुरू

By दिपक दुपारगुडे | Updated: March 23, 2024 19:23 IST

Solapur News: वय वर्षे ४३ असलेला प्रौढ शनिवारी शहरातील शाब्दी नगर येथील कोरड्या नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

- दीपक दुपारगुडे सोलापूर - वय वर्षे ४३ असलेला प्रौढ शनिवारी शहरातील शाब्दी नगर येथील कोरड्या नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रौढाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. नीलकंठ शिवण्णा व्हनचेंजे (वय- ४३, रा. रामलाल नगर, होटगी रोड, सोलापूर) असे या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.

शनिवारी साडेदहाच्या पूर्वी शाब्दीनगर येथील कोरड्या नाल्यात ४३ वयागटातील प्रौढा निपचित पडल्याची माहिती हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची गर्दी झाली. उपस्थितांपैकी पोलिसांना खबर दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार कटके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोपस्कार पूर्ण करुन तातडीने येथील शासकीय रुग्णालयात नेले. तोपर्यंत संबंधीत नातलगापर्यंत ही बाब पोहचली. तेही दाखल झाले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे निदान त्यांनी केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

संबंधीत व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला. घातपाताचा प्रकार आहे का? याचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSolapurसोलापूर