शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर क्राईम; नववीत शिकणाºया मुलाने केला दुसरीतील मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:38 IST

घरकूल परिसरातील घटना : अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

ठळक मुद्देअल्पवयीन मुलावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विडी घरकुल परिसरात हा प्रकार घडलाअल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली

सोलापूर : इयत्ता दुसरीत शिकणाºया सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी इयत्ता नववीमध्ये शिकणाºया अल्पवयीन मुलावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडी घरकुल परिसरात हा प्रकार घडला असून, मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

अल्पवयीन मुलीची आई व मुलाची आई या दररोज विड्यांचा माप देण्यासाठी जात होत्या. दिवाळीपूर्वी दुपारच्या सुमारास दोघी विड्यांचा माप देण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, घरात कोणी नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलाने मुलीस खेळत खेळत स्वत:च्या घरात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार दोन ते तीन वेळा घडला होता. शनिवारी दुपारी पुन्हा दोघांच्या आई विड्यांचे माप देण्यासाठी गेल्या होत्या. घरात कोणी नव्हते, ही संधी साधून अल्पवयीन मुलाने पुन्हा मुलीस घरात नेले तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला त्रास होत होता. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला खासगी रूग्णालयात नेले. ३ ते ४ हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी नेले असता त्यांनी लहान मुलीची केस आहे, तिला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. 

सात रस्ता येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन जाण्यात आले. तेथील डॉक्टरांनी हा गंभीर प्रकार असून तिला शासकीय रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुलीला पुन्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तेथील डॉक्टरांनी पहिल्यांदा पोलिसांत नोंद करा, मगच मुलीचा उपचार करू असे सांगितले. मुलीला त्रास  होत होता, त्यामुळे आईवडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर मुलीवर उपचार करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. 

खासगी डॉक्टरांची पाठमुलगी लहान असून, तिला या प्रकारामुळे वेदना होत आहेत. वेदनेने विव्हळत असताना एकाही खासगी डॉक्टराने मुलीला तपासले नाही. शेवटी जेव्हा पोलिसांत फिर्याद दिली तेव्हा शासकीय रूग्णालयात तिला उपचारासाठी घेण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी