सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 04:43 PM2017-08-31T16:43:45+5:302017-08-31T16:44:23+5:30

सोलापूर दि ३१ :   स्मार्ट सिटीमध्ये आलेले सोलापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करणार, असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.

Solapur city will be free of costing: Mayor | सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर

सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणेगुड इव्हनिंग पथक यामध्ये महापालिकेचे सहाशे कर्मचारी नेमलेविभागीय कार्यालयाकरिता एक स्वतंत्र पालक अधिकारी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३१ :   स्मार्ट सिटीमध्ये आलेले सोलापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करणार, असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, महिला व बालकल्याण अधिकारी दत्तात्रय चौगुले , बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे, आरोग्य समिती सभापती संतोष भोसले, नगरसेवक अ‍ॅड. यु.एन.बेरिया, गुरुशांत धुत्तरगावकर, गणेश वानकर, नागेश वल्याळ, फिरदोस पटेल, मेनका राठोड, मीनाक्षी कंपल्ली , कुमूद अंकाराम, विनोद भोसले आदी उपस्थित होते.
 शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी संबंधित आरोग्य निरीक्षक  व विभागीय अधिकारी यांना नियोजन करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. हागणदारीमुक्त अभियानांतर्गत नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे, याकामी शासनाचे अनुदान देणे व यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना देणे ही कामे मनपा सेवकांनी करावीत, अशा सूचना महापौर बनशेट्टी यांनी दिल्या. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जागा नाही त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये महानगरपालिका बांधून देणार आहे. मनपाची नादुरुस्त शौचालये लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ़ गुड मॉर्निंग पथक, गुड इव्हनिंग पथक यामध्ये महापालिकेचे सहाशे कर्मचारी नेमलेले आहेत़ प्रत्येक विभागीय कार्यालयाकरिता एक स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले़
यावेळी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील शौचालयासंबंधीच्या अडचणी सांगितल्या.  त्या अडचणी विचारात घेऊन त्याप्रमाणे कामे तातडीने करण्याबाबत महापौरांनी आदेश दिले.

Web Title: Solapur city will be free of costing: Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.