शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 10:31 IST

२६/११ हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण : वर्षभरात २२ मॉक ड्रील्स; गर्दीच्या ठिकाणी वॉच

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयात एक एटीएस व क्युआरटी ही दोन पथके कार्यरत वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न

संताजी शिंदेसोलापूर : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया २६ नोव्हेंबर २00८ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईसारखा प्रकार घडल्यास शहरात प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली आहेत. 

मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आठवला की आजही अंगाचा थरकाप उडतो.  या घटनेला दहा वर्षे पूर्ण होताहेत.  या थरार उडवणाºया घटनेमतध्ये ३४ परदेशी नागरिकांसह १९७ लोक यामध्ये ठार झाले होते. ८00 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यात सोलापुरातील नागरिकांचाही समावेश आहे. सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न केला जातो. शहरातील भाजी मार्केट परिसर,गर्दीचे ठिकाण असलेल्या बाजारपेठा, चित्रपटगृहे, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी पोलिसांची करडी नजर असते. या परिसरात जर दहशतवादी हल्ला झालाच तर पोलीस यंत्रणा कशी सतर्क असली पाहिजे व या कृत्याचा बिमोड कसा करायचा, याची प्रात्यक्षिके वारंवार घेतली जातात. 

पोलीस आयुक्तालयात एक एटीएस (अ‍ॅन्टी टेरेरीस्ट स्कॉड) पथक व क्युआरटी (जलद प्रतिसाद पथक) ही दोन पथके कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरक्षा विभागामार्फत प्रात्यक्षिके करून दहशतवादी हल्ल्याचा विरोध कसा करता येईल, हे दाखवून दिले जाते. एस.टी.स्टॅन्ड परिसरात दहशतवादी अतिरेकी आले आहेत, त्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवले आहे, तेव्हा एसटी आगार प्रमुखाचा फोन १00 नंबर किंवा संबंधित पोलीस स्टेशनला जातो. तेथून हा संदेश कंट्रोलला जातो आणि अगदी काही मिनिटांत पोलीस एसटी स्टॅन्ड परिसराचा ताबा घेतात. दहशतवाद्यांशी संवाद साधत त्यांना शिताफीने अटक करतात. या सर्व प्रक्रियेसाठी परिसरातील प्रत्येक व्यक्तीची कशी मदत आवश्यक आहे आणि पोलिसांना काय सहकार्य केले पाहिजे याची माहिती मिळते. अशा पद्धतीने प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेतली जातात. 

बॉम्ब असलेली बॅग अन् पोलिसांची सतर्कता...- भर बाजारपेठेत, सिनेमागृहात किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी एक बेवारस बॅग पोलिसांकडूनच ठेवली जाते, अचानक कंट्रोलला फोन येतो आणि माहिती मिळते. अवघ्या काही मिनिटांत एटीएस आणि क्युआरटीचे पोलीस बेवारस बॅगेजवळ जातात. श्वान पथकाकडून तपासणी होते, डिटेक्टर मशीनने बॅगेचा अंदाज घेतला जातो. परिसरातील लोकांना तत्काळ तेथून हलविले जाते. बॉम्ब निकामी करणारे पोलीस पद्धतशीरपणे बॅग उघडतात आणि सुटकेचा नि:श्वास घेतात.

अशा पद्धतीची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ला यासारख्या कारवाया रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एटीएस व क्युआरटी ही दोन पथके नेहमी सज्ज असतात. सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाºयांना  वारंवार सूचना दिल्या जातात. साध्या वेषात पोलीस कर्मचारी फिरून माहिती घेत असतात. शहरातील प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असते. नागरिकांनीही तितकेच सावध असायला पाहिजे,असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस