शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:23 IST

solapur-city-central Vidhan Sabha Election Results 2019: शहर मध्य विधानसभा मतदारसंघ : एमआयएमवर १२ हजार ७१८ मतांनी मिळविला विजय

ठळक मुद्देशहर मध्यसाठी अटीतटीने लढत झाली, एकूण २० उमेदवार रिंगणात होतेशहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली‘एमआयएम‘चे उमेदवार फारुक शाब्दी यांचा १२ हजार ७१८ मतांनी पराभव केला

राकेश कदम

सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्याप्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांनी ‘एमआयएम‘चे उमेदवार फारुक शाब्दी यांचा १२ हजार ७१८ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसºया तर शिवसेनेचे दिलीप माने चौथ्या क्रमांकावर राहिले. प्रणिती शिंदे या गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांमुळे त्यांना हा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले; तर आयाराम - गयाराम यांना मतदारांनी नाकारले.

शहर मध्यसाठी अटीतटीने लढत झाली. एकूण २० उमेदवार रिंगणात होते. एकूण एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे,  एमआयएमचे फारुक शाब्दी, शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम, अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात प्रमुख लढत झाली. 

काँग्रेसची शिवसेनेसोबत टक्कर असेल असे वातावरण तयार करण्यात आले होते, परंतु काँग्रेस आणि ‘एमआयएम’मध्ये मुख्य लढत झाली. मागच्या निवडणुकीतही अशीच लढत झाली होती. यंदा ‘एमआयएम’ दुसºया स्थानी तर अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसºया क्रमांकावर राहिले. शिवसेना चौथ्या तर नरसय्या आडम पाचव्या क्रमांकावर राहिले.

सकाळी ९ वाजता मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली. प्रणिती शिंदे यांना २४४७, फारुक शाब्दी यांना १७४१, दिलीप माने यांना १६७३ तर महेश कोठे यांना १५९८ मते मिळाली होती.  

दुसºया फेरीत फारुक शाब्दी यांना सर्वाधिक ६८४२ तर प्रणिती शिंदे यांना ३५८२ मते मिळाली. दिलीप माने यांना २४४३ तर महेश कोठे यांना २४१६ मते मिळाली. तिसºया आणि चौथ्या फेरीत शाब्दी यांना पुन्हा मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचे काही पदाधिकारी गांगरुन गेले. ‘थोडे थांबा आपला भाग सुरू होईल तेव्हा शाब्दींच्या मताधिक्यात घट होईल’, असे वरिष्ठ पदाधिकारी सांगू लागले. दुसºया आणि तिसºया फेरीत बेगम पेठ, सिद्धेश्वर पेठ, इक्बाल मैदान, शनिवार पेठ, किडवाई चौक,  भारतीय चौक या भागातील मतपेट्यांचा समावेश होता. 

चौथ्या आणि पाचव्या फेरीत अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, शांती चौक, कसबे सोलापूर, समाधान नगर, सुनील नगर या भागातील मतपेट्यांचा समावेश होता. या भागातून फारुक शाब्दी आणि महेश कोठे यांना मताधिक्य मिळाले. प्रणिती शिंदे तिसºया तर दिलीप माने चौथ्या क्रमांकावर होते. दहाव्या फेरीपर्यंत महेश कोठे आणि त्यानंतर फारुक शाब्दी यांचे मताधिक्य कायम होते. पूर्व भागातून महेश कोठे यांना चांगली साथ मिळाली आहे. 

उमेदवारनिहाय मिळालेली मते - प्रणिती शिंदे ५१ हजार ४४०, एमआयएमचे फारुक शाब्दी ३८ हजार ७२१, अपक्ष महेश कोठे ३० हजार ८१, शिवसेनेचे दिलीप माने २९ हजार २४७,  नरसय्या आडम  १० हजार ५०५, बसपाचे राहुल सर्वगोड ७६९, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज पिरजादे २७६७, आपचे खतीब वकील २२०, हिंदुस्थान जनता पार्टीचे गौस कुरेशी ४०८, अपक्ष उमेदवार - अशोक माचन ३२५, उमेश करपेकर १५१, कल्याणी हलसंगी ३६८, दीपक गवळी ४२०, नागमणी जक्कन २०२, बशीर अहमद शेख ४५७, मनीष गायकवाड ३३९, राजेंद्र रंगरेज २२७, अ‍ॅड. विक्रम कसबे १००, सचिन मस्के २७७.  नोटा : ८०७. 

बघा आम्ही म्हणालो होतो की नाय...- अकराव्या फेरीत रामवाडी, लक्ष्मी-विष्णू चाळ, सुभद्रा नगर, सेटलमेंट, लिमयेवाडी या भागातील मतपेट्या उघडण्यात आल्या. या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना २३ हजार ३४२, महेश कोठे यांना २१ हजार ६९८, फारुक शाब्दी यांना २० हजार ५३६ तर दिलीप माने यांना १६ हजार ३५५ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या नऊ फेºयांमध्ये मागे असलेल्या प्रणिती शिंदे यांनी कोठे यांच्यापेक्षा १६४४ मतांची आघाडी घेतली. चेतन नरोटे मतमोजणी केंद्रातून बाहेर आले. तिथूनच त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना फोन लावला. बघा आम्ही म्हणालो होतो की नाय. मागच्या निवडणुकीत ९ व्या फेरीनंतरच मताधिक्य मिळाले होते. आताही तसेच घडले, असे नराटे यांनी पत्रकारांना सांगितले. इथून जवळपास सर्वच फेºयांमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर राहिल्या. 

प्रणिती शिंदे यांच्या विजयाची कारणे - थेट मतदारांशी नियमित संपर्क, विविध जाती-धर्मातील पुढारी आणि कार्यकर्त्यांचा मेळ घालून राबविलेली प्रचार यंत्रणा, महिला आणि विद्यार्थिनी यांना दिलेला विश्वास, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन केलेले काम, निवडणुकीची ‘डोकेबाज’ रणनीती या जोरावर प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवल्याचे मानले जात आहे.

इतरांच्या पराभवाची कारणे - दिलीप माने यांनी ऐन निवडणुकीत काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मतदारसंघाशी नियमित संपर्क नव्हता. ऐनवेळी यंत्रणा उभारली. बहुभाषिक मतदारांना विश्वास देण्यात अपयश आले. फारुक शाब्दी यांच्या उमेदवारीवर एमआयएमचे नगरसेवक, पदाधिकारी नाराज राहिले. शाब्दी यांची यंत्रणा विस्कळीत होती. सोबतचे सहकारी सतत भांबावलेले होते. अपक्ष म्हणून महेश कोठे यांच्यावर मर्यादा आल्या. ठोस मुद्यावर प्रचार केंद्रीत करता आला नाही. ठराविक लोक सोबत राहिले. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली नाही.  माकपचे नरसय्या आडम यांनी सुरुवातीला वातावरण तापविले होते. अभिजन, नवमतदार माकपपासून दूर राहिला. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPraniti Shindeप्रणिती शिंदेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य