शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

सोलापूर बाजार समिती निवडणूकीसाठी भाजपाच्या गोटात सामसूम, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चाचपणी सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून तगडे उमेदवार देण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे़ सत्ताधारी भाजपाच्या गोटात निवडणुकीबाबत उत्साह असला तरी उमेदवारांच्या नावाबाबत सध्यातरी सामसूमच आहे़ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा एकसंधपणे निवडणुकीच्या ...

ठळक मुद्देमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा एकसंधपणे निवडणुकीच्या तयारीलासोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणारसोलापूर नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर निर्भर राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून तगडे उमेदवार देण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे़ सत्ताधारी भाजपाच्या गोटात निवडणुकीबाबत उत्साह असला तरी उमेदवारांच्या नावाबाबत सध्यातरी सामसूमच आहे़ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा एकसंधपणे निवडणुकीच्या तयारीला लागली आहे़ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे़ नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर निर्भर राहणार आहे़ आपसातील मतभेद विसरून एकत्र आलेले नेते उमेदीने कामाला लागले आहेत़ बाजार समितीवर काँग्रेसचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी ही मंडळी ईर्शेने एकवटली आहेत़ आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार दिलीपराव माने यांच्य नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाणार आहे.गेल्या चार वर्षात काँग्रेस नेत्यांमध्ये फारसे सख्य नव्हते़ सत्येपासून सगळेच दुरावले होते़ त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत या सर्वच नेत्यांना उतरवण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे़ माजी सभापती राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंड-पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्रीशैल नरोळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा घाट घालण्यात आला आहे़भाजपाच्या गोटात मात्र सध्यातरी सामसूमच आहे़ काँग्रेस पक्षात घडणाºया घडामोडींवर भाजपा नेत्यांचे बारक लक्ष आहे़ प्रस्थापित नेत्यांशी दोन हात करू शकणाºया कार्यकर्त्यांची भाजपामध्ये वानवा असल्याने त्यांना उमेदवार निवडीत कसरत करावी लागणार आहे़ नव्या चेहºयांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे़ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी देत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न फलद्रुप झाल्याने भाजपा नेते पुन्हा तोच कित्ता गिरवण्याच्या प्रयत्नात आहेत़ ----------------काँग्रेसचे गणनिहाय संभाव्य उमेदवार - होटगी - हरीश पाटील, श्रीशैल दुधगी, बाळासाहेब पाटील, सुभाष पाटोळे़ - कुंभारी - श्रीशैल नरोळे, आप्पासाहेब बिराजदाऱ- मुस्ती - भीमाशंकर बिराजदाऱ- मंद्रुप - इंदुमती अलगोंड-पाटील- भंडारकवठे - आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, महादेव पाटील, प्रथमेश पाटील, सुरेश हसापुरे- कंदलगाव - सुरेश हसापुरे- औराद - बाळासाहेब शेळके, अमर पाटील (सेना)- बोरामणी - डॉ़ दीपक नारायणकर, डी़ एऩ गायकवाड

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती