शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar : 'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
3
“भुजबळांचे वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार
4
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
5
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
6
Life Lesson: दुःखातही आनंद शोधायचा कसा हे या लाफिंग बुढ्ढाकडून शिका; वाचा ही गोष्ट!
7
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
8
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
9
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
10
७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा
11
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
12
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
13
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
14
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
15
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
16
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
17
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
18
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
19
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
20
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'

सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 5:06 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकगण आणि आरक्षण निहाय बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या सुचनापॅनल भाजपाचे की सर्वसमावेक्षक ?

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत बोलताना सहकारमंत्र्यांनी निवडणुक तयारीला लागा असे संकेत दिले़सहकारमंत्री म्हणाले की, बाजार समितीची निवडणुकीत शेतकºयांच्या थेट मतदानाने होणार आहे़ बाजार समितीत शेतकºयांच्या हिताचे रक्षण करणाºया कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे परंतू उमेदवार लादण्याऐवजी जनतेतून ठरवला जावा असे मत त्यांनी मांडले़गण आणि आरक्षण निहाय बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या सुचना देताना इच्छुकांनी आपले स्वत:चे घोडे दामटण्यापेक्षा इतरांना संधी देणे अधिक संयुक्तिक ठरेल असा चिमटाही काढला़प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर कोणत्याही शेतकºयांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही अथवा मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले़ कार्यकर्त्यांच्या सुचनावर चर्चा करण्यात आली़या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, शिरीष पाटील, उपसभापती संदीप टेळे, पं़ स़ सदस्य प्रा़ एम़ डी़ कमळे, प्रशांत कडते, शशिकांत दुपारगुडे, डॉ़ चनगोंडा हविनाळे, सिध्दाराम हेले, हणमंत कुलकर्णी, राजू काकडे, मधुकर चिवरे, जि़प़सदस्य आण्णाप्पा बाराचारे, सुनिल कळके, महादेव पाटील, शामराव पाटील, सचिन पाटील, मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, रावजी कापसे, मल्लेश्ी कस्तुरे, राधाकृष्ण पाटील, अल्लाउद्दीन शेख, संतोष बरूरे, अरूण गावडे, सुशीला ख्यायगोंडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते़ -------------पॅनल भाजपाचे की सर्वसमावेक्षक ?बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ भाजपाचे पॅनल की अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्वसमावेशक पॅनल तयार करायचे याचीही चाचपणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत केली़ चांगले कार्यकर्ते सोबत येणार असतील त्यांनाही संधी द्यायला हरकत नाही मात्र त्याचे सर्वाधिकार सहकारमंत्र्यांना द्यावेत असा सुर कार्यकर्त्यांनी आळवला़

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती